Sunday, October 6, 2024

कुकाणा येथील राष्ट्रवादीचे सुविधा केंद्र ठरतेय महिलांचा आधारवड

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गटाचे युवानेते अब्दुलभाई शेख यांनी तरवडी चौकात सुरु केलेले सुविधा केंद्र महिलांसाठी आधारवड ठरत आहे.

युवानेते अब्दुलभाई शेख यांनी त्यांच्या संपर्क कार्यालयातून सध्या शासनाने सुरु केलेल्या या सुविधा केंद्रातुन विविध सरकारी योजनेचा लाभ प्रत्यक्षात लाभार्थ्यांना होण्यासाठी शेख यांनी स्वखर्चाने चौदा कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली आहे. विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी मार्गदर्शक कक्षाची स्थापना करण्यात आली. विविध योजनांची माहिती मिळत असल्याने लाभार्थी महिलांची मोठी गर्दी होत आहे.
युवानेते शेख यांनी गेल्या आठवड्यात कुकाणा येथे महिला कामगार मेळावा घेतला. मेळाव्याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष वेधले. त्यामुळे शेख यांच्या राजकीय भुमिकेकडे आता लक्ष लागून असून एक – दोन दिवसांत नेवासा फाटा, सोनई येथेही एक मेळावा आयोजित केलेला आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!