Monday, May 27, 2024

याठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा, या भागात पावसाची शक्यता

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मुंबई, ठाणेसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला. मागील आठवड्यांप्रमाणे हा आठवडा कोरडा आणि उष्ण असणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत तापमान कमी होण्यास थोडासा दिलासा मिळू शकेल.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दक्षिणेकडील काही राज्यांना या आठवड्यात उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पण महाराष्ट्रात या आठवड्यात पावसाची शक्यता फारच कमी आहे.भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांना

उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. याशिवाय, आज कोकणात उष्ण आणि दमट हवामान राहील. विशेषतः मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, जालना आणि नांदेड या भागांमध्ये आज उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.राज्यातील काही भागात तापमान 40 डिग्री

सेल्सिअस पार जाणार असल्याचा अंदाज आहे. येत्या काही दिवसात महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात तापमान सामान्यपेक्षा 5-6 डिग्री सेल्सिअस वाढणे अपेक्षित आहे. मुंबईतील चेंबूर आणि पवई भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे, येथे तापमान 37 डिग्री सेल्सियस पर्यंत वाढू शकते. मुंबईच्या अनेक

भागांमध्ये पुढील चार ते पाच दिवसांत स्थानिक कमाल तापमानात 2-3 अंश सेल्सिअसने घसरण होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आयएमडीने (IMD) आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला उष्णतेचा यलो अलर्ट दिला आहे. 4 आणि 5 मे रोजी कोकणात उष्णतेच्या लाटेचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 5 आणि 6 मे 2024 रोजी नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये वेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आसाम आणि मेघालयात 5 आणि 6 मे 2024 रोजी वेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 5 मे रोजी अरुणाचल प्रदेशात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!