Sunday, October 6, 2024

महीला आणि युवतींनी स्वयंपूर्ण होणे ही काळाची गरज-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवानेते अब्दुलभाई शेख

नेवासा

धकाधकीच्या जीवनात महीला आणि युवतींनी स्वयंपूर्ण होणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवानेते अब्दुलभाई शेख यांनी केले.

नेवासा फाटा येथील सप्तपदी मंगल कार्यालयात रविवार (दि.२९) रोजी सकाळी ११ वाजता एक दिवशीय मोफत ब्युटी पार्लर सेमिनारचे आयोजन केलेले होते. या मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षण शिबीरात आलेल्या महीला व युवतींनी या संधीचे सोने करण्याचे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) गटाचे युवानेते अब्दुलभाऊ शेख यांनी या मेळाव्यात मार्गदर्शन करतांना केले.

राष्ट्रवावादी कॉंग्रेस पक्षाकडून नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून महिला व युवतींना आता स्वयंरोजगाराकडे त्यांची वाटचाल होण्यासाठी या मेळाव्यातून महीला व युवती आर्थिक दृट्या सक्षम होण्यासाठी हा आमचा प्रामाणिक हेतू असून महीलांनीही आता आपल्या कुटुंबीयांना हातभार लावल्यास संसाराची वाटचाल प्रगतीकडे होईल तसेच त्यांचा आत्मविश्वासही वाढेल व त्या स्वावलंबी होतील या उद्देशानेच हे प्रशिक्षण शिबिर राबवित आल्याची माहीती यावेळी शेख यांनी दिली.
या संपन्न झालेल्या मेळाव्यात मेकअप हेअर सेमिनार आयोजित करण्यात आलेले असल्यामुळे यामध्ये स्किन मेकअप हेअर याविषयी एक दिवशीय प्रशिक्षणासाठी सुमारे हजार महीला व युवतींची मोठी उपस्थिती होती.यावेळी उपस्थित झालेल्या महीलांनी मोठ्या आनंदात प्रशिक्षणात भाग घेवून अनेक सांस्कृतीक कार्यक्रमातून आपली कला व्यक्त करुन शेख यांनी घेतलेल्या शिबाराचे महीला व युवतींनी कौतुक केले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!