Monday, October 14, 2024

माहितीचा अधिकार कायदयाचा वापर व्यापक जनहितासाठी व्हावा-अड.सुनील शिंदे

भेंडा/नेवासा

ग्रामपंचायती पासून ते राष्ट्रपती यांचे कार्यालय पर्यंत अज्ञान ते सज्ञान अशा सर्वच भारतीय नागरिकांना माहिती अधिकार कायदा वापरण्याचा अधिकार आहे. मात्र कायदयाचा वापर कुणाला त्रास देण्यासाठी नव्हे तर व्यापक जनहितासाठी व्हावा असे प्रतिपादन कायदा सल्लागार अड.सुनील शिंदे यांनी केले.

भेंडा येथील श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेच्या जिजामाता शास्त्र व कला महाविद्यालयात माहिती अधिकार दिना निमित्त कायदा सल्लागार अॕड.सुनिल शिंदे व सामाजिक कार्यकर्ते कारभारी गरड यांची माहिती अधिकाराच्या संदर्भातील व्याख्याने झाली त्यावेळी अड.शिंदे बोलत होते. शिक्षण संस्थेचे विश्वस्त प्रा.डॉ. नारायणराव म्हस्के कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष लांडगे , उपप्राचार्य डॉ.संभाजी काळे , प्रा.डॉ.काकासाहेब लांडे , कार्यालयीन अधीक्षक बंडू घोडेचोर व्यासपीठावर उपस्थित होते.

अड.सुनील शिंदे पुढे म्हणाले की,
शासनाने अज्ञान ते सज्ञान असलेल्या
सर्व भारतीय नागरिकांना माहितीचा अधिकार दिलेला आहे. त्यामुळे सर्व भारतीय नागरिक अगदी लहान मुले सुद्धा त्यांच्या अज्ञान पालकामार्फत माहितीच्या अधिकाराचा अर्ज करू शकतात.केवळ १० रुपयाचा कोर्ट फी स्टॅम्प लावून सर्वसामान्य नागरिक कोणत्याही सरकारी कार्यालयात माहिती मिळण्यासाठी अर्ज करू शकतात. त्यामध्ये राष्ट्रपती यांचे कार्यालय, सर्वोच्च न्यायालयाची कार्यालय ते ग्रामपंचायत कुठेही अर्ज करू शकतात. या उपलब्ध हक्काचा उपयोग
केवळ कोणाला त्रास देण्यासाठी किंवा कर्मचाऱ्यांचा वेळ वाया घालण्यासाठी
न करता व्यापक जनहित लक्षात घेऊन करावा. या हक्काचा गैरवापर नागरिकांनी करू नये असे आवाहन ही अड.शिंदे यांनी केले.

कारभारी गरड यांनी माहिती अधिकार कायदा कसा तयार झाला, त्यासाठी सामाजिक संघटनांचा सहभाग , भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे अण्णा हजारे व राज्यातील कार्यकर्त्यांचा सहभाग , राज्य माहिती अधिकार कायदा व केंद्रीय माहिती अधिकार कायदा , अपिलाची पध्दती, व्यापक जनहिताचा दृष्टिकोन आणि माहिती अधिकारातुन लोकशाहीस आवश्यक असणारा पारदर्शी कारभार याबाबत माहिती दिली.
डाॕ.संभाजीराव काळे यांनी प्रास्ताविक
केले.प्रा.डाॕ.पांडुरंग देशमुख यांनी आभार मानले.

 

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!