भेंडा/नेवासा
मोबाईल हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झालेला आहे. मोबाईलचा वापर विद्यार्थ्यांनी आपले भविष्य घडविण्यासाठी चांगल्या पद्धतीने करावा असे विचार महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे यांनी व्यक्त केले.
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील जिजामाता शास्त्र व कला महाविद्यालयात दि.३० सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ‘करियर कट्टा ‘ अंतर्गत विद्यार्थी संवाद उपक्रमात अध्यक्षपदावरून श्री. शितोळे बोलत होते.
पुणे विभाग प्राचार्य प्रवर्तक डॉ.दिनानाथ पाटील, नगर जिल्हा समन्वयक नवनाथ नागरे व्यासपीठावर उपस्थित होते.
महाविद्यालयातील कॉलेज कट्टा समन्वयक प्रा. प्रविण घारे यांनी कॉलेज कट्टा उपक्रमासंदर्भात उपस्थित विद्यार्थ्यांना माहिती दिली.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष लांडगे यांनी पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक केले.
कु.नितु निकम या विद्यार्थिनीने सूत्रसंचालन केले. उपप्राचार्य डॉ. संभाजी काळे यांनी आभार मानले.