Sunday, October 6, 2024

निलेश बिबवे यांचा महाराष्ट्र शासनाच्या कृषि सेवारत्न पुरस्काराने सन्मान

नेवासा

नेवासा तालुका कृषि कार्यालया अंतर्गत कार्यरत असलेले  कृषि सहाय्यक निलेश बिबवे यांना  राज्यपालांचे हस्ते सन २०२१ चा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार देऊन गौरविन्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे वतीने राज्यात कृषि, कृषि संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती/संस्था यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार, जिजामाता कृषिभूषण पुरस्कार, कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार, युवा शेतकरी पुरस्कार, उद्यानपंडीत पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट/आदिवासी गट), पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार (आयुक्तालय/मंत्रालय स्तर) असे विविध पुरस्कारांचे वितरण आज रविवार दि.२९ सप्टेंबर रोजी  मुबंई येथील नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया (डोम), वरळी येथे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे हस्ते व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे उपस्थित होते.

कृषि सहाय्यक निलेश बिवबे यांनी डाळिंब बाग पाचट व्यवस्थापन व कृषी विस्तार शेतकरी शेतीच्या शेतकरी शेती शाळा शेतकरी कृषी मेळावे राज्यस्तरावरील रामिती प्रशिक्षण संस्था व्याख्याने शेतकरी गट निर्मिती सेंद्रिय शेती जिल्हा प्रशिक्षणे जिल्हास्तरावरील कृषी मेळावे व्याख्याने व शेतकऱ्याला २४ तास डिजिटल पद्धतीने मार्गदर्शन अधिक क्षेत्रांमध्ये भरीवकार्य केले याकार्यामध्ये मोठे योगदान दिलेले आहे.
त्याबद्दल त्यांना सन २०२१ चा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार देऊन गौरविन्यात आले आहे. यासाठी विभागाचे कृषी सहसंचालक रफिक नाईकवाडी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, उपविभागीय कृषि अधिकारी अमोल काळे, नेवासा तालुका कृषि अधिकारी धनंजय हिरवे, कृषी पर्यवेक्षक बाचकर, कृषी सहायक संघटनेचे जयवंत गदादे , भूषण बिबवे यांनी श्री.बिबवे यांचे  अभिनंदन केले.

 

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!