नेवासा
नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावचे सरपंच शरदराव आरगडे यांनी वडाळा ते सौंदाळा रस्ता तातडीने डांबरीकरणणाचे काम करण्यासाठी उपोषण करणार असल्याचे सांगितले.
उपाभियंता सार्वजनिक बांधकाम नेवासा यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की वडाळा ते सौंदाळा रस्ता मागील ५ वर्षा पासून मंजूर आहे तरीही सौंदाळा हद्दीत दिड की मी रस्त्याचे काम केलेलं नाही त्यामुळे सदरच्या कामाच्या ठेकेदारावर काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्यात आली नाही
काही ठिकाणी रस्त्याचे काम अपूर्ण ठेवलेले आहे
तसेच सौदाळा हद्दीत खूप मोठया प्रमाणात खड्डे पडल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे
तसेच रांजणगाव येथे मागील १० वर्षांपासून पासून खडी क्रेशर आहेत त्यामुळे कधीच रस्ता खराब झाला नाही परंतु फक्त ८ ते १० महिन्यात झालेले भाऊसाहेब अंबाडे यांच्या क्रेशरच्या खडीच्या अवजड बेकायदेशीर वाहतुकीमुळे संपूर्ण रस्ता खड्डामय झालेला आहे त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करून त्यांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे गरजेचे आहे
सदर रस्त्याबाबत आता पर्यंत ५ ते ६ वेळेला आपल्याला लेखी निवेदन व अनेक वेळेला तोंडी चर्चा केलेली आहे परंतु आपण कुठलीच याबाबत कारवाई केलेली नाही म्हणून शुक्रवार दि ४/१०/२०२४ रोजी ११ वा प्रशासनाच्या सोईच्या व कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने सौंदाळा ग्रामपंचायत कार्यालयात आमरण उपोषण स्वतः शरदराव आरगडे करणार असून ग्रामस्थ धरणे आंदोलन करणार आहेत असे निवेदनात म्हंटले आहे.सदरचे निवेदनाच्या प्रती कार्यकारी अभियंता रोहयो उपविभागीय कार्यालय अहमदनगर, मा तहसीलदार नेवासा, मा पोलिस निरीक्षक नेवासा, यांना देण्यात आल्या आहेत