नेवासा
नेवासा तालुक्यातील शिरसगाव येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था संचलित वकीलराव लंघे पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी काळे प्रणव बाबासाहेब यांने गोळा फेक व थाळी फेक या दोनही तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून त्याची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
शिक्षकाचे संस्थेचे अध्यक्ष माजी आ. डॉ.नरेंद्र घुले पाटील, व माजी आ. चंद्रशेखर घुले पाटील साहेब , जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. राजश्रीताई घुले पाटील,सभापती क्षितिज घुले पाटील ,संस्थेचे सचिव अनिल शेवाळे, सहसचिव रवींद्र मोटे व प्रशाकीय अधिकारी प्रा.भारत वाबळे, विद्यालयाचे प्राचार्य आण्णासाहेब काटे व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी सर्वांनी अभिनंदन केले.