नेवासा
तालुक्यातील बाभुळखेडा या गावांमध्ये गुरुवार दि.३ ऑक्टोबर रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास शिवशंकर बाबुराव कडू यांच्या घरावर जबरी चोरी झाली असून यात साततोळे सोने तसेच काही रोख रक्कम दरोडेखोरांनी प्रसार केली आहे.
खबर मिळताच नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी त्वरित बाभुळखेडा येथे घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून जखमींना नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यानंतर अहमदनगर येथील पोलिसांच्या वतीने श्वानपथक तसेच ठसे तज्ञ घटनास्थळी येऊन शॉन सगळीकडे फिरवण्यात आले तसेच त्यांनी घरातील सर्व वस्तूंचे ठसे घेतले.
या घटनेमुळे नेवासा तालुका पूर्ण हादरून गेला आहे.तरी पुढील तपास नेवासा पोलीस करीत आहेत.
याबाबद शिवशंकर बाबुराव कडु (वय 49 वर्षे) धंदा शेती रा. कडुवस्ती, बाभुळखेडा ता. नेवासा जि.अ.नगर यांनी नेवासा पोलीस स्टेशनला हजर होवून लेखी फिर्याद दिली की,दि.02/10/2024 रोजी रात्री 09 वाजेचे सुमारास मी व पत्नी असे जेवण करुन घराच्या दोन्ही दरवाजाच्या आतुन कड्या लावुन झोपी गेलो त्यावेळी जिन्याचा वरचा दरवाजा उघडा राहीला त्यानंतर दि. 03/10/2024 रोजी 04:30 वाजेचे सुमारास मी माझे राहते घरात झोपलेलो असतांना मला कोणीतरी कशाने तरी डोक्यात तसेच इतर ठिकाणी मारहाण केली. त्यावेळी मी डोळे उघडुन पाहीले असता मला समोर तोंड बांधलेले तिन ईसम दिसले त्यांच्या हातात केबल व चाकू होता त्यावेळी ते मला म्हणाले की आरडा ओरडा करु नको पैसे व सोने कोठे आहे असे म्हणाला त्याच वेळी माझी पत्नी बेबी हि उठली तिला ही त्यांनी दोन्ही पायाचे मांडीवर, पोटरीवर बुक्याने मारहाण करुन तोंडाला चापटीने व पाठीवर केबलने मारहाण करुन जखमी केले. त्यातील दोन ईसम आमच्या जवळ थांबले व तिसऱ्या इसमाने माझी पत्नी बेबी हिचे अंगावरील तसेच घरातील कपाटातील, किचनमधील तसेच इतर सामनाची उचकापाचक करून खालीलप्रमाणे सोन्याचे दागीने व रोख रक्कम चोरुन नेली आहे. त्याचे
वर्णन पुढील प्रमाणे
1) 1,20,000/- रु किमतीचे एक सोन्याचे नेकलेस सुमारे दोन तोळे वजनाचे त्यावरच डिझाईन असलेले जु. वा. किं, अं,
2) 1,50,000/- रुपये किंमतीची एक तीन पदरी सोन्याची मोहन माळ, त्यात सोन्याचे मणी व डिझाईनचा पत्ता असलेली सुमारे अडीच तोळे वजनाचे जुवा कि.अ.
3) 90,000/- रु किमतीचे एक सोन्याचे मणीमंगळसुत्र सुमारे दिड तोळे वजनाचे त्यात सोन्याचे मणी असलेले व खाली पत्ता असलेला जु. वा.कि.अं.
4) 60,000/- रुपये किंमतीचे सुमारे एक तोळा वजनाचे सोन्याचे कानातील झुबे त्यास वेल असलेले जु.वा.की.अं.
5) 30,000/- रुपये किंमतीची एक अर्धा तोळा वजनाची एक सोन्याचे मणी असलेले पोत जु.वा.कि.अं. 6) 30,000/- रुपये किंमतीचे एक सोन्याच्या मचल्या सुमारे अर्धा तोळे वजनाचे जु. वा. किं. अं.
7) 30,000/- रुपये किंमतीचे लहाण बाळांचे बाळ्या 2 जोड, गळ्यातील ओम, व एक मनगटी जोड असे एकूण 5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने ज. वा. किं, अं 8) 10,000/- रुपये रोख रक्कम त्यात 500/100/- रुपये दराच्या नोटा
असे एकूण 5,20,000/- रुपये
येणे प्रमाणे वरील वर्णनाचे व किमतीचे सोन्याचे दागीने व रोख रक्कम ही दिनांक 03/10/2024 रोजी पहाटे 04/30 वा.चे सुमारास माझे राहते घरी, बाभुळखेडेंशिवार ता. नेवासा जिल्हा अहमदनगर येथून तीन अनोळखी चोरट्यांनी मला व माझी पत्नी बेबी असे आम्हाला केबलने, व लाथाबुक्याने मारहाण करून जखमी करुन आमचे संमतीशिवाय लबाडीचे इराद्याने स्वताचे फायद्याकरीता चोरुन घेवून जाताना आमचे घराचे मुख्य दरवाजातुन बाहेर गेले व जाताना आमचे घराचे दरवाज्याची बाहेरील कडी लावली होती. त्यानंतर मी आमचे घराजवळ राहणारे प्रशांत कडू यांना फोन केला व हकीगत सांगितल्यानंतर तो आसपासचे माणसांना आमचे घरी घेवून आला व आम्हाला घरातुन बाहेर काढले आहे. ते अनोळखी तीन चोरटे मी तसेच माझी पत्नी बेबी असे आम्ही पाहील्यास त्यांना आम्ही ओळखु. म्हणून माझी त्या तीन अनोळखी चोरट्चघांविरुध्द फिर्याद आहे.
या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 309(6)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय अ. जाधव पोलीस उपनिरीक्षक अहिरे, पोलीस हवालदार राठोड, आंधळे, साठे, केदार, पोलीस नाईक गांगुर्डे, पोलीस कॉन्स्टेबल आप्पा तांबे, नारायण डमाळे, वासुदेव डमाळे यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.
सदर गुन्ह्याच्या घटनास्थळी शेवगाव उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील तसेच मा. अपर पोलीस अधीक्षक वैभव कल्लू बर्मे श्रीरामपूर यांनी देखील भेट देऊन तपासाबाबत आवश्यक सूचना दिलेले आहेत. या जबरी चोरीचा तपास पोलीस ठाण्याबरोबरच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) च्या दोन पथकांनी देखील सुरू केला आहे.श्वान पथक ही मागवीन्यात आले होते.
*अडीच तोळे वजनाचा नेकलेस सापडला…
तपासा दरम्यान पोलिसांना महत्त्वाचे धागे धोरे मिळाले आहेत. लवकरच आरोपी पर्यंत पोहोचू असा विश्वास व्यक्त केला आहे. जबरीने चोरून नेलेल्या ७ तोळ्या दागिन्या पैकी अडीच तोळे वजनाचा नेकलेस पंचनामा करताना घटनास्थळीच मिळून आला आहे अशी माहिती पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली.