नेवासा/सुखदेव फुलारी
माईर्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठ पुणे आणि श्रीक्षेत्र आळंदी देहू विकास समितीच्या वतीने नेवासा येथील जगद्गुरू श्रीसंत तुकाराम महाराज संस्थांनचे प्रमुख गुरुवर्य उध्दव महाराज मंडलिक यांना जागतिक स्तरावरील जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
संत ज्ञानेश्वर माऊली जन्मोत्सव सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष व त्याचबरोबर जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे ३७५ व्या वैकुंठगमन सोहळा पर्वणीच्या निमित्ताने आयेजित केलेल्या १० व्या विज्ञान, अध्यात्म आणि तत्वज्ञान जागतिक परिषदेचे औचित्य साधून आज गुरूवारी सायंकाळी ६ वाजता विश्वराजबाग, लोणी काळभोर, पुणे येथे एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष डाॅ. विश्वनाथ कराड यांचे हस्ते,डॉ. विजय भटकर व मान्यवर इतर मान्यवरांचे हस्ते मंडलिक महाराज यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
उद्धव महाराज मंडलीक यांनी वारकरी संप्रदायासाठी संपूर्ण जीवन समर्पीत केले असून त्यांच्या या कार्याची दखल घेऊन समर्पित जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला आहे.