माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात परतीच्या पावसाने उसंत घेतली आहे. असे असले तरी काही ठिकाणी कमी अधीक प्रमाणात पावसाची हजेरी लागत आहे. अशात भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार,
आज राज्यातील काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो. तर, बहुंताश ठिकाणी ढगाळ वातावरण राहील. त्यानुसार, आज राज्यातील कोणत्या 9 जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे .
परतीच्या पावसाने उसंत घेतल्याने राज्यातील तापमानात वाढ झाली आहे. नागरिकांना ऑक्टोबर हीटचा चटका सहन करावा लागत आहे. अशात काही जिल्ह्यांना आज या वाढत्या तापमानापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. राज्याच्या हवामानाविषयी IMD ने वर्तवलेल्या
अंदाजानुसार, आज पुणे, सातारा, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या 9 जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाची जोरदार हजेरी लागू शकते. तर उद्या म्हणजेच शनिवारी आणि रविवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
तर, शनिवारी आणि रविवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाच्या जोरदार सरी कोसळतील. तर, इतर ठिकाणी हलक्या ते मध्य स्वरुपाचा पाऊस होईल.हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार यंदा ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात मान्सून
राज्यातून दक्षिण भारतात जाण्याची शक्यता आहे. परतीचा पाऊस 10 ऑक्टोबरपर्यंत राज्यातून पूर्णपणे जाईल, असा अंदाज आहे. त्यानंतर आठ ते दहा दिवसांच्या खंडानंतर अवकाळी पावसाला सुरुवात होत आहे.
त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात सरासरीच्या 112 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज आहे.