Thursday, May 14, 2026

मांढरादेवी ते भेंडा ३०० किमी पायी चालून आणली अमर ज्योत

WhatsApp Image 2026-05-13 at 7.08.23 PM
WhatsApp Image 2026-05-13 at 7.08.23 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील नागेबाबा ग्रुपच्या ५५ सदस्यांनी सातारा जिल्ह्यातील श्रीक्षेत्र मांढरदेवी येथील माता काळुबाई मंदिरातून ३०० किलोमीटर पायी चालून अमर ज्योत आणून भेंडा येथे घटस्थापना केली.

अशोक साळवे यांचे नेतृत्वाखाली नागेबाबा ग्रुपचे नवरात्रोत्सव निमित्त विविध तीर्थक्षेत्रावरुन पायी अमर ज्योत आणन्याचे हे २० वर्ष आहे.
या वर्षी भेंडा ते मांढरची काळुबाई जि. सातारा येथून अमर ज्योत आणण्याचे ठरले,त्यानुसार दि.३०/०९/२०२४ रोजी दु. ३ वाजता भेंडा येथून या तरुण मंडळींनी मांढरदेवीकडे प्रस्थान केले.
मांढरदेवी गड़ावरून ज्योत घेऊन ३०० किलोमीटर दोन दिवस व दोन रात्र पायी चालत ही ज्योत भेंडा आणली गेली.यासाठी गावातील वेगवेगळया दात्यांनी नागेबाबा ग्रुपला मदत केली.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!