नेवासा
नेवासा तालुक्यातील बाभुळखेडा येथे तुर पिकावर महाराष्ट्र शासनाच्या कृषी खाते अंतर्गत शेती शाळा पार पडली.
सरपंच महेश औताडे याचे प्रमुख उपस्थित
झालेल्या या शेती शाळे प्रसंगी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना कृषी शास्त्रज्ञ डॉ. अशोकराव ढगे म्हणाले की, तुर पिक पाण्याचा ताण सहन करते, तसेच मध्यम व हलक्या जमिनीत सुद्धा चांगली पीक येते. इतर पिकांपेक्षा तुरीला भाव सुद्धा तुलनात्मक दृष्टीने बरा मिळतो. त्यासाठी शेतकऱ्यांनी तुर पिक घेतली पाहिजे. नेवासा तालुक्यामध्ये यावर्षी सर्वत्र तुरीचे पीक समाधानकारक आहे. तुरीच्या पिकातील धोका शेतकऱ्यांनी ओळखला पाहिजे. तुरीचे उत्पादन कमी होण्यासाठी शेंगा पोखरणारी अळी हे प्रमुख कारण असते. तुर पिक फुलोऱ्यातून शेंगा धारण करण्याच्या अवस्थेत आहे अशा वेळी ढगाळ वातावरण आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी पाच टक्के निंबोळी अर्क फवारणी करावी. शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होण्याची वाट पाहू नये. ज्यांना शक्य असेल त्यांनी एक पाणी दिल्यास अधिक उत्तम होईल. तीन किलो युरिया 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी असा सल्ला डॉ. ढगे यांनी दिला.
शामराव औताडे म्हणाले की, जंगली डुकरामुळे पीक पद्धती बदलत आहे हरभरा पिक दोन पैसे देणारे आहे तथापि जंगली डुकरामुळे फार नुकसान होते. त्यामुळे शेतकरी हरभरा पिक नाविलाजास्तव घेऊ शकत नाही. त्यासाठी वनविभागाने कार्यवाही करावी.
सलाबतपुर मंडलचे कृषी अधिकारी लक्ष्मणराव सुडके यांनी रब्बी हंगामातील कृषी खात्याच्या विविध योजनांची माहिती दिली.
होते. कृषी सहाय्यक राहुल दांडगे व तवले यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते