नेवासा
अध्ययन -अध्यापन प्रक्रियेमध्ये मूल्यशिक्षण महत्वपूर्ण असुन आजच्या काळात मूल्य शिक्षणाच्या माध्यमातून।विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होण्यास मदत होते असे विचार नेवासा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी यांनी व्यक्त केले .
शांतीलाल मुथा फाउंडेशन पुणे व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेर व शिक्षण विभाग पंचायत समिती नेवासा आयोजित जिल्हास्तर मूल्यवर्धन प्रशिक्षण प्राचार्य डॉ.राजेश बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली घाडगे पाटील विद्यालय येथे प्रशिक्षणाचे उद्घाटन तालुका गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण अधिव्याख्याता मुकुंद दहिफळे ,प्राचार्य सोपान काळे, विस्तार अधिकारी रुकसाना शेख , विस्तार अधिकारी मीरा केदार ,बाळासाहेब काशीद, रविंद्र कडू पाटील ,मधुकर घुले, नितीन मिसाळ, काकासाहेब गर्जे, बाळासाहेब पिसाळ, संतोष पवार,सूरज बोरुडे उपस्थित होते.
जिल्हास्तरीय प्रशिक्षण दोन टप्प्यांमध्ये आयोजित करण्यात आले असून पहिल्या टप्प्यात नेवासा व शेवगाव तालुक्यातील ७८ शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे तर दुसऱ्या टप्प्या मध्ये श्रीरामपूर व पाथर्डी तालुक्यातील ६० शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.प्रशिक्षणासाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून नितीन मालानी, शितल गोरे, प्रदीप पाबडे ,राहुल आठरे,अण्णासाहेब शिंदे ,सतीश कुमार बडे हे कामकाज पाहत आहेत.
विषयतज्ञ समी शेख यांनी सूत्रसंचालन
केले. विठ्ठल कांगुणे यांनी आभार मानले.