नेवासा
नेवासा तालुका भारतीय जनता पार्टी कडून तालुक्यातील इमारत व इतर बांधकाम कामगारांना पक्षनिरीक्षक
नैलेश शाहा यांचे हस्ते व माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली 1100 ग्रहउपयोगी संचाचे वितरण करण्यात आले.
भेंडा येथे आयोजित या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून विधानसभा प्रभारी बाळासाहेब गाडेकर,डॉ. बाळासाहेब कोलते, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अंकुशराव काळे,भाजपा तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी, सोमनाथ कचरे, कामगार मोर्चा तालुकाध्यक्ष विवेक नन्नवरे, शहराध्यक्ष रोहित पवार,अण्णासाहेब गव्हाणे, अरुण गरड व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते व बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.*