माय महाराष्ट्र न्यूज.संकटाच्या काळात शाळा, कॉलेजच्या मुलं, मुली तसेच महिलांना मदत मिळावी यासाठी निकटवर्तीयांना तातडीने मेसेज पोहोचवणारी प्रणाली (अॅप) नितीन उदयले फाऊंडेशनच्यावतीने सुरू करण्यात आली
असून काल घटस्थापनेच्या मुहूर्तावर या अॅपचे लोकार्पण करण्यात आल्याची माहिती नितीन उदमले यांनी दिली आहे. याबाबत सांगताना नितीन उदमले महणाले की, नितीन उदमले फाउंडेशन च्या वतीने श्रीरामपूर सुरक्षा प्रणाली हे आपत्कालीन परिस्थिती मध्ये तात्काळ मदत
मिळणे साठी संदेश पाठविणारे अॅप श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांना मोफत उपलब्ध करून देत आहोत.श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील सर्व नागरिकांना उपयोग होणार आहे. विशेषतः महिला,शाळा व कॉलेजच्या विद्यार्थी, विद्यार्थिनी, ज्येष्ठ नागरिक,शेतकरी, कामगार, सर्वच
नागरिक व त्यांच्या कुटुंबातील सर्व महीला,पुरुष, मुले यांच्या साठी हे अॅप अतिशय उपयुक्त ठरणार आहे.यासाठी सर्वांनी या मेसेज मधील पुढील लिंक वापरून हे अॅप डाउनलोड करून घ्यायचे आहे. अॅप ची लिंक https://dpl.ink/NeedlySOS/Nitin_Udmale_Shrirampur_Personal_Safety नितीन उदमले श्रीरामपूर वैयक्तिक सुरक्षितता या अॅपचा उपयोग असा करावा
– १. लिंक वापरून अॅप डाउनलोड केल्यानंतर
– नंतर प्रथम स्वतःची माहिती भरायची आहे. २.त्या नंतर सोबतच्या व्हिडिओ मध्ये सांगितले प्रमाणे आपल्या निकटवर्तीय चार लोकांचे नाव व नंबर त्यामध्ये भरायचे आहेत. ज्यांना आपल्या संकट काळात सर्वात प्रथम संदेश गेला पाहिजे असे आपल्याला वाटते
त्यांचे नंबर टाकावेत. ३. नंबर टाकल्यावर त्या चार लोकांना तुम्ही त्यांचा नंबर या प्रणाली मध्ये टाकला आहे असा संदेश जातो. ज्या मुळे संकट काळी अचानक संदेश आल्यास त्यांचा विश्वास राहील. आपत्कालीन परिस्थितीमध्ये जसे, १. महिलांची छेडछाड होत असेल, २. रस्ते अपघात, ३. बिबट्याचा हल्ला, ४. चोरी, दरोडा, ५. सर्पदंश व इतर अपघात,
६. अचानक होणारे हार्ट अटॅक अथवा अन्य आरोग्य समस्या, ७. इतर ही असंख्य परिस्थिती मध्ये अचानक तुम्हाला मदतीची आवश्यता असेल तेव्हा हे अॅप उपयोगी येईल. या अॅपचा वापर करताना आपत्कालीन परिस्थिती मध्ये अॅप वर क्लीक करून मधोमध दिलेल्या needly sos हे गोल बटन दावल्यास ५ सेकंदात तुम्ही भरलेल्या चार क्रमांकावर तुम्ही अडचणीत असल्याचा संदेश व तुमचे सध्याचे google loca tion पाठवले जाईल.
ज्या मुळे तुमचे निकटवर्तीय तुमच्या पर्यंत तातडीने मदत पोहचवू शकतील. २. अॅप स्क्रीन वरती एक सायरनचे बटण दिले असून ते दाबल्यास सावस्नचा आवाज येतो. महिलांना, मुलींना छेडछाड होत असेल तर स्थानिक मदत मिळने साठी याचा उपयोग होईल. ३. अॅप स्क्रीन वर खाली पोलिसांचा ११२ क्रमांक वर थेट डायल करायची
सुविधा देण्यात आली आहे. ज्या द्वारे तुम्ही थेट पोलिसांना मदत मागू शकता. या मध्ये काही अतिरिक्त सुविधा नजीकच्या काळात वाढवल्या जातील.प्रत्येक नागरिकाची सुरक्षा ही एकसामाजिक जबाबदारी आहे या भूमिकेतून वरील सुविधा नितीन उदमले यांनी आपणास मोफत उपलब्ध करून दिली आहे. तरी नितीन उदमले
फाउंडेशन द्वारे उपलब्ध केलेले श्रीरामपूर सुरक्षा प्रणाली अॅप डाऊनलोड करण्यासाठी पाठवलेल्या लिंकचा वापर करण्याचे आवाहन करत आहोत. तसेच आपल्या सर्व नातेवाईक, मित्र परिवार यांनाही हा मेसेज फॉरवर्ड करावा जेणेकरून त्यांना ही बाचा उपयोग होईल. घट स्थापनेच्या निम्मिताने सुरु करत असलेली ही प्रणाली महिलांच्या सुरक्षिताते साठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास
नितन उदमले यांनी व्यक्त केला आहे. मतदारसंघातील एका जरी व्यक्तीला वेळीच मदत मिळण्या साठी याचा उपयोग झाला तरी आमचे प्रयत्न सार्थकी लागले असे वाटेल, अँप लिंक ची लिंक या मेसेज मध्ये दिलेली आहे. तरीही काही अडचण आल्यास खालील क्रमांकावर व्हाट्सअॅप करून लिंक उपलब्ध करून घेता येईल. १. विजय आखाडे ९८२२८६२१३६,
२. नितीन उदमले यांचे कार्यालय +९१७७९८७ ५५७१९. तरी या अॅपचा जास्तीत जास्त नागरीकांनी उपयोग करावा, असे आवाहन माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष नितीन उदमले यांनी केले आहे.
नितीन उदमले फाउंडेशन च्या माध्यमातून आपत्कालीन परिस्थिती मध्ये निकटवर्तीय लोकांना मेसेज व लोकेशन पाठवणारी श्रीरामपूर सुरक्षा प्रणालीचे काल घटस्थापने च्या निम्मिताने लोकार्पण केले आहे.