Sunday, December 22, 2024

नगर जिल्ह्यातील भाजपच्या या आमदारांवर पक्षाच्याच नेत्याने केले गंभीर आरोप

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे यांच्या विरोधात भाजपचेच प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे यांनी गंभीर आरोप केलेत. यामुळे अहमदनगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपूर्वी भाजपने मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांबाबत पक्षातील पदाधिकाऱ्यांची काय मते आहेत? हे जाणून घेण्यासाठी निवडणूक निरीक्षक म्हणून विजय साने यांना पाठवले होते. त्यावेळी बंद पाकिटात पदाधिकाऱ्यांनी आपले मतं द्यायची होती,

मात्र, विद्यमान आमदारांनी जे लोक भाजपमध्ये नाहीत, अशा लोकांना त्या बैठकीला पाठवले असल्याचे अरुण मुंडे यांनी म्हटले आहे. या बैठकीत अरुण मुंडे समर्थकांनी आक्षेप घेतल्याने काही काळ गोंधळ देखील उडाला होता. दरम्यान अरुण मुंडे यांनी

आपल्याच पक्षाच्या विद्यमान आमदारांवर टीका करताना “पक्षाने तुम्हाला दोन वेळा आमदार केलं आहे आता तुम्ही थांबलं पाहिजे”, तुम्ही म्हणता की तिकीट फिक्स, कामाला लागा! तर त्यांचे (मोनिका राजळे) तिकीट काही फिक्स झालेलं नाही त्यांच्या पायाखालची

वाळू सरकली आहे, अशी टीका अरुण मुंडे यांनी केली आहे.  यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पक्ष वेगळाच विचार करेल आणि मला किंवा गोकुळ दौंड यांनाच तिकीट मिळेल, असा विश्वासदेखील अरुण मुंडे यांनी व्यक्त केलाय. त्यामुळे भाजपच्या विद्यमान

आमदार मोनिका राजळे यांना स्वपक्षातूनच विरोध होऊ लागल्याचे दिसत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मोनिका राजळे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!