नेवासा
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरके) च्या वतीने नेवासा फाटा येथे कार्यकर्त्यांचा व पदाधिकाऱ्यांचा मेळावा संपन्न झाला.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरके) चे संस्थापक अध्यक्ष राजाराम खरात यांच्या उपस्थितीत व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुरेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न झाला. या झालेल्या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी नेवासा तालुका कार्याध्यक्ष अशोक दळवी हे होते.
या वेळी बोलतांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरके) चे संस्थापक अध्यक्ष राजाराम खरात म्हणाले की, येणाऱ्या विधानसभे विषयी कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊन पक्षाच्या वतीने त्या समस्या सोडवण्यासाठी चर्चा करण्यात आली, झालेल्या मेळाव्याच्या माध्यमातून जिल्ह्यात चांगला संदेश जाऊन मतदार संघातील नागरिक प्रत्येक प्रश्नांवर संघटित होऊन संघर्ष करतील अशी एक आशा निर्माण झाली आहे. संघर्ष हा अटळ असतो आणि संघर्षासाठी एकच पक्ष तो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आर के पक्ष शेतकऱ्यांच्या कामगारांच्या व अन्याय विरुद्ध लढू शकतो असे मत व्यक्त केले.
कोलमडलेली आरोग्य व्यवस्था शिक्षणाचा बट्याबोळ, शेती, शेतकरी, शेत मजुरांचे प्रशन, रोजगाराचे प्रश्न वाढत असलेली महागाई अनेक मागासवर्गीय विद्यार्थीची शिष्यवृती बंद, महिलांवर वाढते अत्याचार, दलितांवर होणारे अत्याचार यासह विविध विषयांवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
या मेळाव्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आर के चे केंद्रीय उपाध्यक्ष सुनील कांबळे, केंद्रीय सचिव प्रकाश कांबळे, महाराष्ट्र उपाध्यक्ष जावेद पटवारी, नेवासा तालुका अध्यक्ष अशोक गाढवे, नेवासा तालुका संघट योहान चक्रनारायन, नेवासा तालुका खजिनदार संदीप दळवी, नेवासा तालुका सचिव संजय दवंडे, प्रकाश साठे, सखाराम साठे, दत्तात्रेय साठे, इरसन जगदाळे, प्रदीप दळवी, सुखदेव साठे, सुशीला दळवी, मुकिंदपुर ग्रामपंचायत सदस्य मंदा इंगळे, यांच्यासह अधिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.