माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान किसान सन्मान निधीचा १८ वा हप्ता आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. पीएम किसान सन्मान निधीचा १८ वा हप्ता आज देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे.
तुमच्या खात्यात PM किसानचे पैसे आले नसतील तर काळजी करू नका. तुम्ही केंद्र सरकारनं उपलब्ध करून दिलेल्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून याबाबत माहिती करून घेऊ शकता.तुमचे बँक खाते आधारशी लिंक केलेले नसेल तर
तुम्हाला पीएम किसान सन्मान निधीचा लाभ मिळणार नाही. तसंच, जर तुम्ही तुमच्या बँक खात्याचे KYC केले नसेल, तर PM सम्मान निधीचे पैसे तुमच्या खात्यात येणार नाहीत. बँक खाते केवायसी आणि बँक खाते आधारशी लिंक केल्यानंतर, पुढील हप्ता तुमच्या खात्यात
नक्कीच येईल. याशिवाय हप्ता न मिळाल्यास खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून माहिती मिळवू शकता.पीएम किसानशी संबंधित कोणत्याही माहितीसाठी तुम्ही टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक 011-23381092 वर संपर्क साधू शकता.
याशिवाय, तुम्ही अधिकृत ईमेल आयडी pm kisan -ict@gov.in वर देखील संपर्क साधू शकता. इथं तुमच्या तक्रारीची दखल घेऊन त्यावर मार्ग काढला जाईल.पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 18 वा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांना मिळेल. पण त्यासाठी
तुमचे नाव यादीत असायला हवे. pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा. शेतकरी कॉर्नर या पर्यायावर जा. लाभार्थ्यांच्या यादीवर जा. तुमचा आधार क्रमाक, खाते क्रमांक नोंदवा. “Get Data” वर क्लिक करा. पेमेंट स्टेट्स चेक करा. ई-केवायसी पूर्ण झाला
असेल तर लाभार्थ्याला रक्कम मिळण्यास अडचण येत नाही. खात्यासोबत आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. तरच खात्यात पैसा येईल