माय महाराष्ट्र न्यूज:माॅन्सूनचा परतीचा प्रवास अखेर महाराष्ट्रापर्यंत आला. नंदूरबार जिल्ह्यात परतीचा माॅन्सून पोचला. राज्याच्या बहुतांशी भागात मागील आठवडाभरापासून पावसाची उघडीप आहे. तर तुरळक ठिकाणी
हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडत आहेत. राज्यात पुढील ५ दिवस काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला. माॅन्सूनने आजही काही राज्यांमधून माघार घेतली. आज माॅन्सूनने उत्तर प्रदेश, गुजरात आणि मध्य प्रदेशच्या आणखी
काही भागातून माघार घेतली. तर महाराष्ट्राच्या काही भागातूनही माॅन्सून परतला. आज माॅन्सूनचा परतीचा प्रवास नंदूरबार जिल्ह्यापर्यंत झाला. माॅन्सूनची सिमा आज नौटनवा, सुलतानपूर, पन्ना, नरमदापुरम, खरगोन, नंदूरबार आणि नवसारी भागात होती. माॅन्सून पुढील २ ते ३ दिवसांमध्ये गुजरात,
मध्य प्रदेशच्या उर्वरित भागातून माघारी फिरेल. तर महाराष्ट्राच्या आणखी काही भागातून माघार घेईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला.माॅन्सूनचा परतीचा प्रवास अखेर महाराष्ट्रापर्यंत आला. नंदूरबार जिल्ह्यात परतीचा माॅन्सून पोचला.
राज्याच्या बहुतांशी भागात मागील आठवडाभरापासून पावसाची उघडीप आहे. तर तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडत आहेत. राज्यात पुढील ५ दिवस काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला.
माॅन्सूनने काही राज्यांमधून माघार घेतली. आज माॅन्सूनने उत्तर प्रदेश, गुजरात आणि मध्य प्रदेशच्या आणखी काही भागातून माघार घेतली. तर महाराष्ट्राच्या काही भागातूनही माॅन्सून परतला. आज माॅन्सूनचा परतीचा प्रवास नंदूरबार जिल्ह्यापर्यंत झाला.
माॅन्सूनची सिमा आज नौटनवा, सुलतानपूर, पन्ना, नरमदापुरम, खरगोन, नंदूरबार आणि नवसारी भागात होती. माॅन्सून पुढील २ ते ३ दिवसांमध्ये गुजरात, मध्य प्रदेशच्या उर्वरित भागातून माघारी फिरेल. तर महाराष्ट्राच्या आणखी काही भागातून माघार घेईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला.
आज कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, पुणे, नगर, नाशिक, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर सातारा, सोलापूर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर
तसेच जळगाव जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज काही ठिकाणी आहे.सोमवारी आणि मंगळवारीही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.
तसेच राज्यात किमान तापमानातही वाढ होण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे.