माय महाराष्ट्र न्यूज:तिसरी आघाडी म्हणजे भाजपने पुढे केलेली टीम तर नाही ना अशी शंका आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केलीय. मतविभाजन करण्यासाठीच तिसरी आघाडी उघडल्याचा दावाही रोहित पवारांनी केलाय. झी २४ तासच्या
मुलाखतीत रोहित पवारांनी हे विधान केलंय. महायुती आणि महाविकास आघाडीला सक्षम पर्याय म्हणून संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी आणि बच्चू कडूंनी एकत्र येत परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडी उघडली आहे.
याच तिस-या आघाडीवर रोहित पवारांनी आपली शंका बोलून दाखवली आहे.महायुतीमध्ये एकनाथ शिंदेंची वाढलेली ताकद भाजपला आवडलेली नाही.असा खळबळजनक दावा आमदार रोहित पवारांनी केलाय. त्याचसोबत शरद पवारांची ताकद कमी
करण्यासाठी कुटुंब फोडलं असा मोठा आरोपही रोहित पवारांनी केलाय.. मात्र लोकं ही शरद पवारांची ताकद आहेत असा इशारा रोहित पवारांनी सत्ताधा-यांना दिला.दुसऱ्यांना झुंजवण्यापेक्षा देवेंद्र फडणवीसांनी कर्जत जामखेडमधून लढावं असं आव्हान रोहित पवारांनी
दिलंय. टू द पॉईंट या विशेष मुलाखतीत रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान दिलंय. जामखेडमधून अजित पवार निवडणूक लढणार का या प्रश्नावर बोलताना त्यांनी फडणवीसांवर टीका केलीय. कर्जत जामखेड हा मतदारसंघ
महायुतीत भाजपच्या वाट्याला आहे. त्यामुळं अजित पवारांना जामखेडमधून उतरवण्यापेक्षा फडणवीसांनी जामखेड लढवावं असं रोहित पवार म्हणालेत.जयंत पाटलांशी कोणतेही मोठे मतभेद नसल्याचं स्पष्टीकरण आमदार रोहित पवारांनी दिलंय. टू द पॉईंट या विशेष
मुलाखतीत रोहित पवार बोलत होते. दोघांमध्ये मोठे मतभेद नाहीत पण विरोधक या मतभेदांना संघर्षाचं स्वरुप देत असल्याचा आरोपही रोहित पवारांनी केलाय. रोहित पवारांचे जयंत पाटलांसोबत तीव्र मतभेद असल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.शरद पवारांचा यंदा 85 वा वाढदिवस आहे .
त्यांच्या 85 व्या वाढदिवसाला 85 जागा निवडून याव्यात ही कार्यकर्त्यांची भावनिक इच्छा असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय.