Thursday, May 14, 2026

ब्रेकिंग:नगर जिल्ह्यातील बड्या नेत्यांनी शरद पवारांची भेट घेऊन पक्ष प्रवेशाची चर्चा ?….

WhatsApp Image 2026-05-13 at 7.08.23 PM
WhatsApp Image 2026-05-13 at 7.08.23 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रातील बडे नेते रामराजे निंबाळकर आता अजित पवार यांची साथ सोडणार आहेत. ते ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गटात ते लवकरच

प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रवेशाचा मुहूर्त लवकरच निश्चित होण्याची शक्यता असून यामुळे अजित पवार यांना पुन्हा एकदा धक्का बसणार आहे.विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्यापूर्वीच ज्येष्ठ नेते

शरद पवार यांच्याकडून विरोधकांना मोठे धक्कातंत्र देण्याचे काम सध्या सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच मोदी बागेतील त्यांच्या निवासस्थानी सोलापूर, नगर जिल्ह्यातील बडे नेते आमदारांनी शरद पवार यांची भेट घेऊन पक्ष प्रवेशाची चर्चा केल्याचे समजते. त्यामुळे महायुतीला

मोठा धक्का देण्याची रणनिती पवार यांनी आखल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. भाजपचे मोठे नेते असलेले हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये अस्वस्थ होते. पाटील यांनी शरद पवार यांच्याशी चर्चा करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले.

महायुतीला धक्का बसला असतानाच पवार यांनी आणखी दुसरा धक्का अजित पवार यांना देण्याची तयारी केल्याची चर्चा सुरु झाली आहे. यावरुन राजकीय वर्तुळातील हे प्रयोग निवडणुकीपर्यंत चालणार असल्याचे संकेत मिळतात.पुण्यात निसर्ग मंगल कार्यालयात

शरद पवार यांनी मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातील इच्छुकांच्या मुलाखती शनिवारपासून सुरू केल्या आहेत. पुढील दोन दिवस या मुलाखतींचे सत्र सुरू राहील.दरम्यान नगर जिल्ह्यातील बडे नेते आमदारांनी शरद पवार यांची भेट घेऊन

पक्ष प्रवेशाची चर्चा केल्याचे समजते आहे. शरद पवार यांना मानणारा अहमदनगर जिल्हा म्हणून ओळखला जातो याच जिल्ह्यातून निलेश लंके सारख्या एका तरुण आमदाराला जिल्ह्याने खासदार केले आहे त्यामुळे जिल्हाही शरद पवारांच्या मागे

प्रत्येक वेळी मागे उभा राहतो. विधानसभेलाही जिल्ह्यातील अनेक नेते शरद पवारांची साथ घेऊन प्रवेश करणार असल्याची चर्चा जिल्ह्यात आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!