Thursday, November 7, 2024

बुधवारपासून महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता

माय महाराष्ट्र न्यूज: बुधवार ते शुक्रवार (९ ते ११ ऑक्टोबर) पर्यंतच्या ३ दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वीजा व गडगडाटीसह किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. पावसाची तीव्रता त्यानंतरही दोन दिवस असु शकते.

विशेषतः सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर व संपूर्ण मराठवाडा अश्या १३ जिल्ह्यात मात्र मध्यम स्वरूपाच्या वळीव पावसाची शक्यता ह्या ३ दिवसात अधिक जाणवते.

संपुर्ण महाराष्ट्रात मंगळवार(८ ऑक्टोबर) पर्यन्त खरीप पीक – काढणी, रब्बी लागवडीसाठीची मशागत, सोयाबीनचे खळे, हरबरा पेर, नवीन उन्हाळ कांदा रोप-टाकणी, आगाप लाल कांदा काढणी, ऊस लागवड, रोप जर उपलब्ध असेल तर आगाप रांगडा-लाल कांदा लागवड,

तर टप्प्या-टप्प्यातील द्राक्षे बाग-छाटणी आदी शेतकामे, शेतकऱ्यांनी उरकण्याचा प्रयत्न करावा, असे वाटते.यातही वातावरणात जर काही बदल जाणवलाच तर शेतकऱ्यांना २ ते ३ दिवस अगोदरच सुचित करता येईल, असे वाटते. तरी पण उर्वरित २३ जिल्ह्यांत

शेतकऱ्यांनी न घाबरता शेत कामावर झडपच घालावी, असे वाटते.कोजागिरी पौर्णिमा ते नरक चतुर्दशी (१५ ते ३१ ऑक्टोबर) दरम्यानच्या दुसऱ्या पंधरवड्यातील पावसाळी वातावरण हे ‘ला-निना’ विकसन किंवा अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात,

घसरणाऱ्या हवेच्या दाबांतून कदाचित चक्रीवादळाची बीज रोवणी किंवा ५ ते २० डिग्री उत्तर अक्षवृत्त दरम्यान पुर्वेकडून वाहणाऱ्या मजबुत आर्द्रतायुक्त वाऱ्यामुळे, संपूर्ण महाराष्ट्रात ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात म्हणजे कोजागिरी पौर्णिमा ते

नरक चतुर्दशी (१५ ते ३१ ऑक्टोबर) दरम्यान मध्यम पावसाची शक्यता जाणवते. – माणिकराव खुळे, जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते, पुणे

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!