Thursday, November 7, 2024

अहमदनगर शहराचे नाव ‘अहिल्यानगर’ पण जिल्ह्याचे नाव राहणार तेच; सरकारी आदेश जारी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर करण्याच्या मागणीला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. ही मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत होती. राज्य सरकारने पाठवलेल्या प्रस्तावाला

केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. राज्याचे महसूल आणि पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. त्यामुळे आता अहमदनगर जिल्हा अहिल्यानगर नावाने ओळखला जाणार आहे.

अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर असे करण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून करण्यात येत होती. औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांची नावं बदलल्यानंतर अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलण्याच्या मागणीला जोर चढला.

गेल्या वर्षी चोंडी येथे झालेल्या अहिल्यादेवींच्या जयंती दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलण्याची घोषणा केली होती. त्यांनी जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचं नाव देण्याची घोषणा केली होती.

दरम्यान अहमदनगर शहराचे नाव बदलून ते अहिल्यानगर असे करण्याबाबत राज्य शासनाने राजपत्र प्रसिद्ध केले आहे. जिल्ह्याचे नाव अहमदनगर असेच राहणार आहे. शासनाचे उपसचिव दि. ब. मोरे यांच्या नावाने ४ ऑक्टोबर रोजी हे राजपत्र

प्रकाशित झाले आहे. अहमदनगर शहराच्या नामकरणास गृह मंत्रालयाने १ ऑक्टोबर रोजी अनुमती दिली. त्यानुसार या अधिसूचनेद्वारे अहमदनगर शहराचे नाव बदलून ते ‘अहिल्यानगर, तालुका व जिल्हा अहमदनगर’, असे करण्यात येत आहे, असे या राजपत्रात म्हटले आहे.

असाधारण क्रमांक ११२ या क्रमांकाने हे राजपत्र प्रसिद्ध झाले आहे. या राजपत्रानुसार अहमदनगर शहराचे नाव आता अहिल्यानगर म्हणून ओळखले जाईल. मात्र जिल्ह्याचे नाव हे अहमदनगर असेच राहणार आहे.

जामखेड तालुक्यातील चोंडी येथे अहिल्यादेवींच्या जयंतीदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगरचे नामकरण करण्याची घोषणा केली होती त्यानुसार शासनाने हे राजपत्र प्रसिद्ध केले आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!