नेवासा
विकास कामांना गती द्यायची असेल तर गावातील मतभेद विसरून एकोप्याने राहिले तर गावाच्या विकास कामांना हातभार लागतो असे प्रतिपादन जिल्हा परिषद बांधकाम समितीचे माजी सभापती सुनिल गडाख यांनी केले.
नेवासा तालुक्यातील पानेगांव येथील शिरेगांव रोड लगत असलेल्या राम मंदिर ते जंगले वस्ती व पानेगांव चिमटा रोड लगत नामदेव शेलार ते सागर जंगले वस्ती खडिकरण कामांचा शुभारंभ सुनिल गडाख यांचा हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
श्री.गडाख पुढे म्हणाले की, माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख पाटील यांचा मार्गदर्शनाखाली तालुक्यातील आनेक विकास कामं मार्गी लागले असून त्यांनी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याने हे शक्य झालं आहे. भविष्यात हि विकासाची घोडदौड सुरूच राहणार असून शेवटच्या घटकांपर्यंत गडाख परीवार काम करतो गांव पातळीवर ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने कलह वाद विवाद निर्माण होत नाही. एकोपा वाढीस लागतो. आपला माणूस विधानसभेत पाठविण्यासाठी शंकरराव गडाख पाटील यांचा पाठिमागे भक्कम पणे उभा राहिले पाहिजे. काहीही काम असेल तर हक्काने सांगा पण तुमचे अंतर्गत रुसवे फुगवे आमच्यावर काढू नका आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहे यावेळी सुनिल गडाख यांनी सांगितले.
रामेश्वर महाराज कंठाळे, किशोर भणगे ,संजय जंगले आदींनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी पानेगांवचे उपसरपंच दत्तात्रय घोलप,पाराजी गुडधे,मुळाचे संचालक संजय जंगले, रंगनाथ जंगले, माजी उपसरपंच डॉ जयवंत गुडधे, तंटामुक्ती अध्यक्ष उद्धव चिंधे, उपाध्यक्ष सुरेंद्र जंगले, सुरज जंगले,शिवाजी तुवर, रामराजे जंगले, किशोर जंगले,जालिंदर जंगले बबनराव जंगले, शिवाजी जंगले,राजेंद्र जंगले, साहेबराव जंगले,विजय जंगले, नारायण जंगले, विकास जंगले नवनाथ जंगले, गोविंद जंगले, रामदास जंगले सतिश जंगले, जगन्नाथ नवगिरे, ज्ञानेश्वर जंगले, विशाल जंगले, संकेत गुडधे, रमेश गुडधे गुडू जंगले,सागर जंगले, नामदेव शेलार, निलेश घोलप, सोपान बिडे, बाळासाहेब घोलप जालिंदर गागरे, जनार्दन गागरे, अर्जुन काकडे, रघूनाथ जंगले,भाऊसाहेब काकडे, अशोक काकडे,अशोक गागरे,सागर आंबेकर, डॉ काकडे, मुकुंद घोलप बाबासाहेब जिवरक,मोहन जंगले कचरु जंगले, दत्तात्रय कल्हापुरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
संदिप जंगले यांनी सुत्रसंचालन केले.
अॅड मनोज दौंड यांनी आभार मानले.