Thursday, November 7, 2024

ब्रेकिंग:नगर जिल्ह्यात पवारांनी केली या उमेदवाराची घोषणा; या शिलेदाराला दिले पुन्हा विधानसभेचे तिकीट 

माय महाराष्ट्र न्यूज:लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. तर नेत्यांकडून विधासभेच्या

पार्श्वभूमीवर राज्यभरात सभा आणि मेळावे सुरु आहेत. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा अकोलेत दाखल झाली. अकोले येथील सभेत बोलताना अजित पवारांनी थेट उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे.

अजित पवार म्हणाले की, गेल्या पाच वर्षातील तीनच वर्ष मला काम करायला मिळाले. या तीन वर्षात तुमच्या बहाद्दर आमदाराने (किरण लहामटे) माझ्या मागे लागून अकोले तालुक्यासाठी भरघोस निधी घेतला. आधीचे दोन वर्षे मिळाली असती तर

अधिक काम करता आलं असतं. तिजोरीचा भार पाहून मला कामे करावे लागतात.  विधानसभा काही निवडणुकीसाठी ठिकाणी घड्याळ, काही ठिकाणी धनुष्यबाण तर काही ठिकाणी भाजपचे चिन्ह असेल. ही सर्व महायुतीचे चिन्ह आहेत. तुमच्या मतदारसंघात

घड्याळ हे चिन्ह असेल, असे म्हणत अजित पवारांनी विद्यमान आमदार किरण लहामटे यांची अकोले विधानसभा मतदारसंघांतून उमेदवारी जाहीर केली. अजित पवार पुढे म्हणाले की, जन सन्मान यात्रा निघाल्यापासून मी कोणावर टीका करत नाही. आम्ही

केलेली विकास काम जनतेला सांगतोय. त्यामुळे अकोल्यात घड्याळाच बटन दाबावं लागेल. तुम्ही फक्त तेवढं काम करा. त्यानंतर तुमच्या अडचणी दूर करण्याचं काम आमचं आहे. आम्ही एकदा बहुमताजवळ गेलो की सरकार आलंच. केंद्रात जाऊन सरकार आणलं मदत करा

हे सांगू. मी शेतकऱ्यांच्या संस्थांना मदत करणारा शेतकऱ्यांचा सुपुत्र आहे. अकोले साखर कारखान्याची अडचण केंद्रात जाऊन सोडवली. आहे ना आमच्यात धमक. कशाला दुसऱ्यांकडे जायचं.

लोकसभेला विरोधकांनी दिशाभूल केली. आमच्याबद्दल खोटा प्रचार केला त्याची किंमत आम्हाला मोजवी लागली.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!