Monday, January 20, 2025

पीएम किसान योजनेचे पैसे आले नाहीत? ही प्रोसेस करा; पैसे लगेच होतील जमा”

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:”केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना राबवली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये मिळतात. या योजनेचा १८वा हप्ता कोट्यवधी

शेतकऱ्यांच्या अकाउंटला जमा करण्यात आला आहे. ५ ऑक्टोबर रोजी या योजनेचा हप्ता जमा करण्यात आला आहे. या योजनेत जर तुमच्या अकाउंटवर पैसे आले नसतील तर काळजी करण्याची काहीही गरज नाही. तुम्ही हेल्पलाइन नंबरवर फोन करुन मदत मिळवू शकतात.

पीएम किसान सन्मान निधीचे पैसे न येण्याची कारणे:पीएम किसान सन्मान निधी योजनेत जर तुमचे बँक अकाउंट आणि आधार कार्ड लिंक नसेल तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. याचसोबत तुम्ही बँक अकाउंटचे केवायसी केले नसेल तर पैसे मिळणार आहे.

जर तु्म्ही आता बँक अकाउंटचे केवायसी केले तर तुमच्या अकाउंटला पुढचा जमा केला जाईल.तसेच तुम्हाला १८वा हप्ता आला नसेल तर त्याबाबत सर्व माहिती तुम्हाला मिळू शकते.”पीएम किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्व माहिती तुम्हाला टोल फ्री हेल्पलाइन

नंबर ०११-२३३८१०९२ या नंबरवर देण्यात आली आहे.त्याचसोबत तुम्हाला pm kisan-ict@gov.in या ईमेल आयडीवर संपर्क करु शकतात. यानंतर पीएम सन्मान निधी योजनेबाबत सर्व माहिती मिळेल.

पीएम किसान योजनेत eKYC करण्याची प्रोसेस:सर्वप्रथम तुम्हाला pmkisan.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. त्यानंतर farmers corner या सेक्शनवर जाऊन eKYC ऑप्शन सिलेक्ट करावे लागेल.यानंतर तुम्हाला eKYC पेजवर जाऊन १२ अंकी

आधार नंबर टाकावा लागेल. त्यानंतर सर्च ऑप्शनवर क्लिक करा.यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकावा लागेल.त्यानंतर ओटीपी टाका.यानंतर तुम्ही सबमिट बटणवर क्लिक करा. यानंतर तुमचे eKYC पूर्ण होईल.

“स्टेट्‍स कसा चेक करायचा :सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.होमपेजवर know your status या ऑप्शनवर क्लिक करा.यानंतर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी

योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर टाकावा लागेल. त्यानंतर ओटी टाकावा लागेल.ओटीपी टाकल्यानंतर तुमच्या स्क्रिनवर लगेचच योजनेचा स्टेट्‍स दिसेल.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!