नेवासा/सुखदेव फुलारी
एकच गावात तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची लक्ष्मीमाता, माहूरची रेणुकादेवी, वणीची सप्तशृंगी देवी अशी साडेतीन शक्तिपीठे असल्याने नवरात्र काळात भाविकांना दर्शनाचा मिळतो त्रिवेणी लाभ.
अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील रांजणगावदेवी येथील नवसाला पावणाऱ्या तुळजाभवानी, लक्ष्मीमाता, रेणुकादेवी व सप्तशृंगी देवी मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवामध्ये घटस्थापने पासून ते दसऱ्यापर्यंत निरनिराळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या उत्सवानिमित्ताने मंदिर परिसरात साफसफाई करून मंदिरात आकर्षक अशी विद्युत रोशनाई करण्यात आली आहे. घटस्थापनेपासून येथे परिसरातून उपासकरू येतात व तेथेच नऊ दिवस राहतात. नऊ दिवस येथे फराळाची व्यवस्था केलेली असते. रांजणगाव येथे भाविकांना देवीच्या साडेतीन शक्तीपीठाचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभते. माहुरगडची रेणुका माता,तुळजापूरची तुळजाभवानी माता, कोल्हापूरची महालक्ष्मी माता हे पूर्ण तीन शक्ती पीठे तर तर वनीची सप्तशृंगी हे अर्धे शक्तिपीठ असे एकूण साडेतीन शक्तीपीठाच्या दर्शनाचा एकत्रित लाभ भाविकांना मिळतो. याबरोबरच राशींनची यमाई माता, चेंडूळची चौंडेश्वरी माता या देवींची देखील भव्य दिव्य अशी मंदिरे आहेत. गावातील तरुण मंडळाने मोहटादेवी, तुळजापूर, राशिन, चौढाळा आदी विविध ठिकरणा वरून ज्योत आणुन ब्रम्हवृदांच्या मंत्रोचारात आश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना करण्यात आली. या मंदीरातून परिसरातील सर्व देवीभक्त आपापल्या घरी ज्योत घेऊन जातात.तसेच तालुक्यातील श्रीक्षेत्र रांजणगांवदेवी येथे नवरात्र उत्सवा निमित्ताने घटस्थापनेपासून भाविक येथे येऊन घटस्थापना करतातनवरात्र उत्सवात येथे निरनिराळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
भास्करगिरी महाराज व प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.
नवरात्रात येणाऱ्या भाविकांकरिता स्वयंपाक गृह, अंघोळीची व्यवस्था, शौचालय अदी सोयी करण्यात आलेल्या आहेत. मंदीर परिसरात पेव्हींग ब्लॉक बसविण्यात आले आहेत. यात्रेकरुना बसण्याची सोय करण्यात आली आहे. यात्रेच्या दिवशी भाविकांचे व्यवस्थित दर्शन व्हावे या करीता दर्शन रांगेचे नियोजन केलेले असून वहाणासाठी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.
नवरात्रात नऊ दिवस दररोज फराळाचे पंक्तीचे आयोजन केलेले असून विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. दररोज देवी महात्म्य ग्रंथाचे वाचन केले जाते. ७ व्या माळेला पहाटे ५ वाजे पासून भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते, सायंकाळी दिपमाळ प्रज्वलीत केली जाते व देवि समोर भळंद खेळला जातो. नवमीला सर्व देवींचे मंदीरा समोर होम होऊन नवरात्र उत्सवाची सांगता होते.
सातव्या माळेला शनिवार दि.९ ऑक्टोबर रोजी भव्यदिव्य यात्रा भरणार आहे. त्यानिमित्ताने होणारे गर्दीचे नियोजन यात्रा कमिटी व विश्वस्तानी केले असून सर्व परिसरातील भाविकांनी या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.