Sunday, November 16, 2025

डॉ.बाळासाहेब कोलते यांची भाजपा वैद्यकीय आघाडी उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदी नियुक्ती

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील प्रसिद्ध भूलतज्ञ डॉ.बाळासाहेब कोंडीराम कोलते यांची भाजपा वैद्यकीय आघाडी उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजपा वैद्यकीय आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश संयोजक डॉ.बाळासाहेब हरपळे यांनी भाजपा वैद्यकीय आघाडीचे प्रदेश प्रभारी व प्रदेश उपाध्यक्ष, खासदार डॉ.अजित गोपछडे यांच्या संमत्तीने सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनिय कार्याबद्धल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाने ही नियुक्ती करण्यात आल्याचे पत्रात नमूद केले आहे.
रुग्ण, गोरगरीब जनता व त्यांचे नातेवाईक यांच्याबद्धल सेवाव्रतीभाव लक्षात घेवून भाजपा वैद्यकीय आघाडीचे पक्ष संघटन वाढवण्यासाठी व पक्षाची ध्येयधोरणे सर्व सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न कराल अशी अपेक्षा या नियुक्ती पत्रात व्यक्त करण्यात आलेली आहे.

या नियुक्ती बद्दल पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, भाजपा जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, विधानसभा संयोजक सचिन देसरडा, भाजपा प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे,नितीन दिनकर, उधोजक प्रभाकर शिंदे, ऋषिकेश शेटे, ज्ञानेश्वर पेचे, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी, महिला आघाडी अध्यक्ष डॉ.मनीषा वाघ आदींनी डॉ.कोलते यांचे अभिनंदन केले आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!