नेवासा
योग्य आहार- विहार, प्राणायाम, योगासने आणि भारतीय जीवन पद्धतीचे अनुसरण करुन आपण शारीरिक, मानसिक समतोल राखू शकतो. त्यासाठी भारतीय जीवन पद्धतीच आदर्श असल्याचे मत प्रा.डॉ.ज्योती तनपुरे यांनी व्यक्त केले.
भेंडा येथील श्री.मारुतरावजी घुले पाटील शिक्षण संस्थेच्या जिजामाता शास्त्र व कला महाविद्यालयात मानसशास्त्र विभागातर्फे आयोजित ‘जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त’ आयोजित व्याख्यान प्रसंगी त्या बोलत होत्या.
शिक्षण संस्थेचे विश्वस्त प्रा. डॉ नारायणराव म्हस्के हे कार्यक्रमाचे अध्यक्ष
होते. उपप्राचार्य डॉ. संभाजी काळे, कला शाखाप्रमुख डॉ. काकासाहेब लांडे, डॉ.संभाजी तनपुरे, डॉ.रावसाहेब फुलारी तसेच विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यावेळी उपस्थित होते.
मानसशास्त्र विभाग प्रमुख प्रा. संतोष शेळके यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. महेश जावळे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. संजय दरवडे यांनी आभार मानले.