नेवासा
नेवासा तालुक्यातून हजारो कार्यकर्ते भगवान भक्ती गडावरील दसरा मेळाव्यास जाणार असल्याची माहिती भानसहिवरे येथील लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र कीर्तने यांनी दिली.
अधिक माहिती देताना श्री.कीर्तने यांनी सांगितले की,नेवासा तालुक्यातील सर्व अठरापगड जातीतील ओबीसी बांधव भगवान भक्ती गडावर हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहे. भगवान भक्ती गडावर दसरा मेळाव्याचे दशक पूर्ण होत आहे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांनी दसरा मेळाव्याची परंपरा भगवान गडावर सुरू केली होती. अठरापगड जातीने दसरा मेळावा निमित्त एकत्र येऊन प्रत्येकाची विचार आचाराची देवाण-घेवाण होत होती. तसेच मुंडे साहेबांचे विचार ऐकून वर्षभरासाठी ऊर्जा मिळत होती तीच परंपरा पुढे आमदार पंकजाताई मुंडे यांनी चालू ठेवली आहे. आमदार पंकजाताई मुंडे भगवान भक्ती गडावर काय बोलतात याकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. नेवासा तालुक्यातील जास्तीत जास्त बांधवांनी दसरा मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र कीर्तने, महादेव दराडे, देविदास साळुंखे,बाळासाहेब क्षीरसागर, राहुल जावळे, जनार्दन जाधव,
रामदास गोल्हार, रावसाहेब घुले, बाबासाहेब गोल्हार, संदीप ताकपेरे, अशोक कोळेकर, अविनाश ढवाण, डॉ.रामनाथ बडे,उद्धव आव्हाड,राजेंद्र दराडे आदींनी केले आहे.