लातूर
हल्लीच्या तरुणांनी कृषी प्रक्रिया उद्योगात उतरून काम करण्याची आवश्यकता आहे. येणाऱ्या काळामध्ये या सर्व उद्योगांना खूप भविष्य आहे, असे प्रतिपादन उद्योजक कृषिरत्न बी. बी. ठोंबरे यांनी केले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या
वतीने लातूर जिल्ह्यांमध्ये उद्योजकता विकास यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ही यात्रा लातूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून मार्गक्रमण करत ४८ महाविद्यालय ९ वसतिगृहांमधून लातूर येथे आली. यानिमित्ताने आयोजित यात्रेच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जेएसपीएम शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, लातूर विभाग संघटनमंत्री अजित केंद्रे आदी उपस्थित होते.
श्री ठोंबरे म्हणाले, विद्यार्थ्यांनी येणाऱ्या काळामध्ये उद्योजकतेकडे वळण्याची गरज आहे. आज अनेक संधी व्यवसायामध्ये आहेत. केंद्र शासन व राज्य सरकारच्या विविध योजना आहेत. त्या नवीन व्यावसायिकांसाठी राबवल्या जात आहेत, त्याबद्दलची संपूर्ण माहिती करून घेण्याची आवश्यकता आहे. यासाठी विद्यार्थी परिषद काम करत आहे, हे महत्त्वपूर्ण आहे, असे नमूद केले.
कार्यक्रमास अभाविपचे प्रांत संयोजक वैभव चव्हाण, पूर्व नगराध्यक्ष प्रा. याज्ञेश जनगावे, पूर्व नगरमंत्री अवि गजभारे, अभाविप जिल्हाप्रमुख प्रा. शिवप्रसाद डोंगरे, विभाग संयोजक प्रणव सगर, महानगर मंत्री राऊत, सुशांत एकोर्गे, वैष्णवी शितोळे, केदार मोरगे उपस्थित होते.