नेवासा
नेवासा तालुक्यातील तरवडी, येथील सत्यशोधक मुकुंदराव पाटील माध्यमिक विद्यालयाची इयत्ता 8 वीची विद्यार्थीनी कु. साक्षी रावसाहेब बोराटे हिने बुधवार दि. 09 रोजी प्रवरा पब्लिक स्कूल प्रवरानगर येथे 14 वर्षे मुली लांब उडी या स्पर्धेत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवला असून तिची विभाग स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग,सचिव उत्तमराव पाटील, विद्यालयाचे मुख्याध्यापक सावता गायकवाड व सर्व शिक्षक कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले.