अहिल्यानगर/सुखदेव फुलारी
“गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान योजना” या योजनेअंतर्गत ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार व मुकादम यांच्या वारसदारांना तातडीने मदत मिळण्यासाठी या शासन निर्णयाच्या प्रस्तावनेत नमूद जिल्हयांकरीता जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात येत आहे.
सदर समितीची रचना व कार्य खालीलप्रमाणे आहेत..
*जिल्हास्तरीय समितीची रचना व कार्य खालीलप्रमाणे आहेत.:-
१) जिल्हाधिकारी -अध्यक्ष
२) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परीषद- सदस्य
३) जिल्हा शल्य चिकित्सक-सदस्य
४) जिल्हा आरोग्य अधिकारी-सदस्य
५)पशु वैद्यकीय अधिकारी-सदस्य
६) प्रादेशिक सहसंचालक (साखर) किंवा त्यांचा प्रतिनिधी-सदस्य
७) व्यवस्थापक, गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ, पुणे-सदस्य
८) सहायक आयुक्त, समाजकल्याण-सदस्य सचिव
————–
*जिल्हास्तरीय समितीचे कार्य:-
१.योजने संबंधित प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने कार्यवाही करणे व प्रतिमहा बैठक य आढावा घेणे,
२. योजनेअंतर्गत प्राप्त प्रस्तावांची छाननी करून प्राप्त प्रस्तावांना मान्यता देणे,
३. सानुग्रह प्रस्तावातील कागदपत्रांच्या त्रुटी पुर्ततेसाठी संबंधित यंत्रणांना सूचना देणे.
४. समितीची त्रैमासिक बैठक घेण्यात यावी त्यामध्ये जिल्हयातील प्रकरणांचा आढावा घ्यावा.
५. सदर योजनेअंतर्गत नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्याबाबत लाभार्थी अथवा शासकीय यंत्रणामध्ये विवाद निर्माण झाल्यास त्याबाबत समाधानकारक तोडगा काढणे.
६ .उपरोक्त नमूद कागदपत्रे याबाबत विवक्षित प्रकरणात अपवादात्मक परिस्थितीत सानुग्रह अनुदानाबाबत सुट देणे संबंधी निर्णय घेणे
७. परिच्छेद क्र. ७ मधील अपघाताच्या स्वरुपाच्या संदर्भात तक्त्यात क्रमांक १ ते १२ मधील नमूद कारणांव्यतिरिक्त इत्तर काही कारणांमुळे मृत्यू/अपंगत्व आले असल्यास अशा विवक्षित प्रकरणात जिल्हा समितीने विभागीय समितीच्या सहमतीने निर्णय घ्यावा.
८. पात्र सानुग्रह अनुदानाचे प्रस्ताव व्यवस्थापकीय संचालक, गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडे पाठविणे.
९. जिल्हयातील सर्व लाभार्थीचे तसेच बैलजोडी यांचे नोंदणीकरण, Digital Record गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ यांच्याकडे उपलब्ध असण्याबाबत वेळोवेळी आढावा घेणे.
*विभागीय समिती…
या योजनेचे सनियंत्रण करण्यासाठी विभागीय आयुक्त, औरंगाबाद विभाग/नाशिक विभाग यापैकी वरीष्ठ सेवाज्येष्ठता असलेल्या विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विमागस्तरीय समिती स्थापन करण्यात येत असून त्याची रचना व कार्य खालीलप्रमाणे असतील…
१) विभागीय आयुक्त, औरंगाबाद/नाशिक विभाग-ज्येष्ठतेनुसार अध्यक्ष व सहअध्यक्ष
२) आयुक्त, समाजकल्याण-सदस्य
३) जिल्हाधिकारी, बीड, अहमदनगर, जालना, नांदेड, परभणी,धाराशिव, लातूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव-सदस्य
४) व्यवस्थापकीय संचालक, गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ, पुणे- सदस्य सचिव
*विभाग स्तरीय समितीची कार्य…
१. योजनेच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवणे,
२. योजनेच्या अंमलबजावणीवेळी येणाऱ्या विविध अडचणींच्या संदर्भात निर्णय घेणे, तसेच जिल्हास्तरीय समितीने बैल जोडीच्या अपंगत्याबाबत मार्गदर्शन मागितल्यास त्यावर निर्णय देणे.
३. परिच्छेद क्र. ७ मधील अपघाताच्या स्वरुपाच्या संदर्भात तक्त्यामध्ये क्रमांक १ ते १२ मधील नमूद कारणांव्यतिरिक्त इतर काही कारणांमुळे मृत्यू/अपंगत्व आले असल्यास अशा विवक्षित प्रकरणात जिल्हा समितीने मार्गदर्शन मागितल्यास त्यावर निर्णय देणे.
४. योजनेच्या अंमलबजावणीबाबत सहामाही आढावा घेऊन त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करावा.
५. सर्व लाभार्थीचे तसेच बैलजोडी यांचे नोंदणीकरण, Digital Record गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ यांच्याकडे उपलब्ध ठेवण्याबाबत वेळोवेळी आढावा घेणे.
या योजनेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी व्यवस्थापकीय संचालक, गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ, पुणे यांची राहील. तसेच व्यवस्थापकीय संचालक, गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ, पुणे यांनी योजनेच्या अमलबजावणीचाबत प्रत्येक ३ महिन्यास आढावा घेऊन त्याबाबचा प्रगती अहवाल शासनास सादर करणे बंधनकारक राहील.
प्रस्तुत योजनेबाबतच्या सविसार मार्गदर्शक सूचना व्यवस्थापकीय संचालक, गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ, पुणे यांनी निर्गमित कराव्यात.
(उत्तरार्ध)