Wednesday, February 12, 2025

नेवासा तालुक्यातील सुरेगाव-नेवरगाव पुलाचे बांधकामासाठी ३८ कोटिंची निविदा प्रसिद्ध

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/सुखदेव फुलारी

पालक मंत्री  ना.राधाकृष्ण विखे यांच्या प्रयत्न व गुरुवर्य उद्धव महाराज मंडलीक यांचे पाठपुराव्याला यश मिळाले असून
नेवासा तालुक्यातील सुरेगाव ते गंगापूर तालुक्यातील नेवरगाव  या गोदावरी नदीवरील पुलाच्या कामाची ३८ कोटिंची निविदा प्रसिद्ध झाली आहे.

नेवासा तालुक्यातील तिर्थक्षेत्रांची असलेली ठिकाणे विचारात घेवून  नेवासा तालुक्यातील सुरेगाव ते गंगापूर तालुक्यातील नेवरगाव  या गोदावरी नदीवरील पुलाचे काम व्हावे याकरिता नेवासा येथील संत तुकाराम संस्थानचे प्रमुख उध्दव महाराज मंडलिक यांनी मंत्री विखे पाटील यांची भेट घेवून या पुलाच्या कामास निधी उपलब्ध करून देण्याबाबत साकडे घातले होते.मंत्री विखे पाटील यांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा करून पुलाच्या कामास निधी उपलब्ध करुन देण्याची केलेली विनंती मान्य करून मंत्री मंत्रीस्तरावर या कामाला मंजुरी देऊन टोकन अमाऊंट म्हणून सुमारे ५ लाख रुपयांचा निधी मंजूर  करून या
पुलाच्या कामाचे लवकरच अंदाज पत्रक तयार करून काम मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते.

त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या रोजगार हमी योजना (कार्य) विभाग अहमदनगर या कार्यालयाकड़ून या पुलाचे बांधकामासाठी ३८ कोटी रूपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.

नेवासा तालुक्यातील सुरेगाव प्रजिमा-७ पासून संकटेश्वर मंदिर नेवरगाव, ता. गंगापुरला जोडणारा गोदावरी नदीवर मोठा पुल बांधणे करिता ३८०० लाख रूपयांची ही निविदा असून ई-निविदा भरण्याचा कालावधी दि.११ ते २५ ऑक्टोबर आहे.निविदापूर्वक बैठक दि. १७ रोजी होईल.
तर दि. २८ ऑक्टोबर रोजी ई-निविदा उघडणेत येणार आहे.

*उध्दव महाराज मंडलीक…

नेवासा तालुका हे मोठे  तिर्थस्थान आहे. ज्ञानेश्वरी लिहीलेल ठिकाण म्हणून पवित्र स्थान आहे. संत तुकाराम महाराज, मोहनीराज मंदीर यांच्यासह इतरही मोठी तिर्थस्थान असल्याने संपूर्ण राज्यातून भाविक तालुक्यात मोठ्या संख्येने येतात.नेवरगाव आणि सुरेगाव ही दोन्ही गाव या पुलाच्या कामाने जोडली गेल्यास या मार्गाची मोठी मदत भाविक आणी दोन्ही गावातील शेतकरी, नागरीक, विद्यार्थी यांना होईल.मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढाकार घेऊन या पुलाचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल भाविक व नागरिकांचे त्यांना धन्यवाद आहेत.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!