माय महाराष्ट्र न्यूज:विधानसभेच्या निवडणुका कुठल्याही क्षणी लागू शकतात. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मिटलेला नाही. लोकसभा निवडणुकीत ज्या मुद्द्यामुळे भाजपला फटका बसल्याचं जाणकार सांगत होते, त्याच मराठा आरक्षणामुळे विधानसभेत
भाजपला धक्का बसू शकतो. मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे यांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यासाठी एक ट्रॅप लावल्याचं दिसून येतंय. ‘सरकारनामा’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी याबाबत पुसटसं भाष्य केलं आहे.
विधानसभेच्या निवडणुका, मराठा आरक्षण आणि दसरा मेळावा यावरील प्रश्नावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, दसरा मेळावा हा परंपरेचा मेळावा आहे. जातीचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही. त्यासाठी
आमची स्वतंत्र बैठक होईल. दसरा मेळाव्यामध्ये मी सामाजिक तत्त्वाचे मुद्दे मांडणार आहे.मनोज जरांगे पाटील म्हणाले की, यांना आता आचारसंहिता लावूच द्या.आता ठेवतच नाही. पाडतोच सगळ्यांना. आमच्या डोळ्यादेखता तुम्ही आमचा अनादर केला, आम्हाला
हिणवलं आहे. दुसऱ्या समाजाला दिलं आहे.. भरदुपारी आमच्या डोळ्यात चटणी टाकून दरोडा टाकत आहात. हे सगळं सत्तेच्या मस्तीवर सुरुय. पण आता मी ह्यांची सत्ताच ठेवत नाही. मी एकदा बोललो तर मग मागे सरकत नसतो.. मीही मग समाजासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो.
उमेदवार उभे करण्यासाठी झालेल्या बैठका, चर्चा आणि आलेले बायोडेटा यावर उत्तर देतना जरांगे पाटील म्हणाले, त्या प्लॅनबद्दल आत्ताच बोलणार नाही. पाडायचं फिक्स आहे. निर्णय घेताना पाडायचापण घ्यायचाच आहे आणि समाजाला विचारुन आपली लोकं उभी करायीच आहेत.
”आम्हाला समाजाचे लोकं सत्तेत पाठवायची आहेत. निवडणुका लढवण्याबद्दल लवकरच भूमिका जाहीर करणार आहे.. एकदा आचारसंहिता लागू द्या. सत्तेतल्या लोकांनी दिलेली खुन्नस मराठ्यांसाठी आणि सरकारसाठी चांगली नाही. त्यांचं म्हणणंय, कितीही लढा,
किती उपोषणं करा, मराठ्यांना मोजत नाही, तुमच्या डोळ्यादेखता आरक्षण दिलं, करा काय करायरचं ते.. अशी खुन्नस आम्हाला सत्ताधाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे त्यांचा मी बिमोड करणार आहे. एकदा ह्या पठ्ठ्याने ठरवलं ना या राज्यात कुणाचीच सत्तेत यायची टप्पर नाही.” असं म्हणत जरांगेंनी थेट इशारा दिला आहे.