नेवासा/प्रतिनिधी
नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी चोरी-घरफोडी टाळण्यासाठी नागरिकांना काही महत्वाच्या टिप्स दिल्या आहेत. त्या आचारणात आणल्या तर काही प्रमाणात का होईना चोरी-घरफोडीला आळा बसेल अशी आशा आहे.
*काय आहेत त्या टिप्स,चला जाणून घेऊयात….
1.चोरी-घोरफोडी विशेषता मध्यरात्री 1 ते 4 च्या दरम्यान होत असल्याने घराचे दरवाजे-खिडक्या उघडे ठेवु नयेत, काळजी घ्यावी.
2. घरात प्रवेश करण्याचे सर्व मार्ग व्यवस्थित बंद करावेत.
3.घराचे आजूबाजूस पुरेशा प्रकाशाची व्यवस्था करावी.
4.शक्य असेल तिथे सीसीटीव्ही बसवुन घ्यावेत.
5. आजूबाजूच्या परिसरामध्ये सीसीटीव्ही लावून घ्यावेत, व ते चालू राहतील याची खबरदारी घ्यावी.
6. घरामध्ये शक्यतो रोकड, दागिने कमीत कमी ठेवावेत.
7. बाहेरगावी जाताना दागिने, पैसे शेजारी विश्वासू व्यक्ती किंवा नातेवाईकाकडे ठेवावेत.
8. गावातील तरुणांचे गट करून ग्राम सुरक्षा दल तयार करून गस्त घालावी.
9. संशयित दिसल्यास शक्य असल्यास त्यास ताब्यात घेऊन पोलिसांना 112 नंबरला तात्काळ कॉल करावा. (अपुऱ्या, मोघम, खात्रीशीर नसलेल्या माहिती शिवाय विनाकारण कॉल करू नये) जमावाकडून कोणत्याही प्रकारे मारहाण होणार नाही याची काळजी घ्यावी.
10. गावातील जास्तीत जास्त मोबाईल ग्रामसुरक्षा यंत्रणेला जोडून घ्यावेत यासाठी स्थानिक ग्रामसेवकाशी संपर्क करावा, आवश्यकता पडल्यास ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या 18002703600 या नंबरला कॉल करून इतरांना सतर्क करावे.