भेंडा/नेवासा
राजकीय पक्षाचे श्रेयवादात आडकलेल्या भेंडा बुद्रुक बसस्थानकाचे प्रहार जनशक्ति पक्षाने दशमीच्या मुहूर्तावर लोकापर्ण केले आहे.
भेंडा बुद्रुक येथे १० लाख रुपये खर्च करून बांधन्यात आलेल्या बसस्थानक बांधकाम प्रकरणी गावातील दोन राजकीय गटात श्रेयवादची लढाई सूरु असतांनाच प्रहारने बाजी मारत या बसस्थानकाचे प्रहारचे जिल्हाप्रमुख अभिजीत पोटे यांचे उपस्थितीत एका
प्रवासी महिलेच्या हस्ते विजया दशमीच्या मुहूर्तावर लोकापर्ण केले.
यावेळी बोलतांना प्रहारचे जिल्हाप्रमुख अभिजीत पोटे म्हणाले की, नामदार बच्चुभाऊ कडू यांचे मार्गदर्शनाखाली आम्ही भेंडा येथे प्रवासी निवारा बसस्थानक व्हावे याकरिता जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेसह जिल्हा रस्ता सुरक्षा समिती व जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सातत्याने पाठपुरावा केला. त्याला मिळून या बसस्थानकासाठी नागरी सुविधेतून १० लाख रूपयांचा निधी मिळाला. या कामाचे कोणी राजकीय श्रेय घेत असले तरी हे काम प्रहारचेच आहे. प्रवासी माय-बाप रखरत्या उन्हात तासंतास बसची वाट पहात उभे राहत होते, तेंव्हा कोणाला त्यांची कीव आली नाही,पण प्रहारने शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधुन कापडी मंडप देऊन महीनाभर सावलीची व्यवस्था केली होते हे सर्वाना माहित आहे.या कामाला मंजूरी मिळालेल्या पत्रांवर प्रहारचा उल्लेख आहे,त्यामुळे आमच्या कामाचे कोणी ही श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये.
यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संघटक बाळासाहेब खर्जुले, प्रहार धरणग्रस्त कृती समितीचे जिल्हाप्रमुख कृष्णा सातपुते, नेवासा तालुका प्रहार चालक-मालक वाहतूक संघटना प्रमुख चंद्रकांत नवथर, नेवासा तालुका प्रमुख जालिंदर आरगडे, नेवासा तालुका युवक कार्याध्यक्ष देविदास मनाळ,भेंडा शाखा अध्यक्ष मोतीराम शिंदे, भेंडा ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब गजरे, विठ्ठल नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष कृष्णा गव्हाणे,सौंदाळा सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र चामुटे, बंडू आरगडे, पिंटू वाघडकर, संजय बोधक,रामभाऊ राव,सचिन साठे,दीपक सोलट आदि यावेळी उपस्थित होते.