भेंडा/नेवासा
नेवासा तालुक्यातील भेंडा येथे टीव्हीएम ग्रुपच्या वतीने विजयादशमीच्या मुहूर्तावर सुरू करण्यात आलेल्या सई सुपर मार्टचे उद्घाटन लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक बस स्थान चौकात नव्याने सुरू करण्यात आलेल्या सई सुपर मार्टच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार पांडुरंग अभंग होते. डॉ.सौ निवेदिता उदयन गडाख, काशिनाथ नवले, बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील, संचालक बाळासाहेब नवले,नेवासा पंचायत समितीचे माजी सभापती रावसाहेब कांगणे, ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक शिवाजीराव कोलते ,भाऊसाहेब कांगणे,अशोकराव मिसाळ,उद्योजक बापूसाहेब नजन , कावीळ उपचार तज्ञ सुनील वाबळे, डॉ.लहानु मिसाळ, बाजार समितीचे संचालक संतोष मिसाळ,किशोर मिसाळ यांच्यासह भेंडा गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.
टीव्हीएम ग्रुपचे प्रमुख तुकाराम मिसाळ यांनी उपस्थित मान्यवरांचा सन्मान केला. प्रा.डॉ.निवृत्ती मिसाळ यांनी प्रास्ताविक केले.माजी सरपंच प्रा.उषा मिसाळ यांनी आभार मानले.