नेवासा/प्रतिनिधी
अखंड भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भूमिपूजन करण्याचे भाग्य लाभले याचा विशेष अभिमान आहे. सर्व धर्म समभाव जपत सामाजिक ऐक्य साधून समतेचा संदेश देत छत्रपती शिवरायांनी रयतेच्या कल्याणाची भूमिका घेतली असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आ.शंकरराव गडाख यांनी केले.
नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथे विजयादशमी निमित्त शनिवार दि. 13 ऑक्टोबर 2024 रोजी आ.शंकरराव गडाख यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा भूमिपूजन तसेच खंडोबा मंदिर सभामंडप, स्वामी समर्थ मंदिर सुशोभीकरण, लक्ष्मी माता मंदिर सभामंडप,संत सावता महाराज मंदिर संरक्षण भिंत, हनुमान विद्यालय ते श्री स्वामी समर्थ मंदिर,रोकडोबा हनुमान मंदिर स्ट्रीट लाईट बसविणे या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न झाले.
याप्रसंगी दत्तात्रय महाराज त-हाळ, संजय महाराज सरोदे,राजेंद्र शिंदे,कार्ल्स साठे,नवनाथ पठाडे, बाळासाहेब शिंदे,काकासाहेब शिंदे,माजी जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब शेळके,माजी सभापती दिगंबर शिंदे,माजी सभापती वसंतराव रोटे,सरपंच कृष्णा शिंदे,माजी प स सदस्य रवींद्र शेरकर,अशोकचे संचालक अमोल कोकणे,मा सरपंच राजेंद्र साठे,पो पाटील संजय साठे,मा सरपंच योगेश म्हस्के,प्रभाकर पटारे,विष्णू आव्हाड,मा सरपंच बाळासाहेब त-हाळ,चेअरमन आप्पासाहेब रोटे,मा उपसरपंच बंडू चौगुले,गंगाधर चौगुले,बाळासाहेब पुंड, कल्याण शिंदे,वसंतराव शेरकर, सुभाष सरोदे,किशोर गारुळे,दादासाहेब शिंदे,फकिरा कांगुणे,भिमराज साठे,अमीन सय्यद,वसंतराव भद्रे,विष्णुपंत शिरसाठ, नवनाथ कांगुणे,संतोष माळवे,विवेक शिंदे,महेंद्र साठे,अशोक कनगरे,बबन कनगरे,आण्णा वैद्य,रामेश्वर तनपुरे,कैलास झगरे,राजेंद्र कदम,विलास शिंदे,विजय शेरकर,सचिन सोनवणे,गणेश धीर्डे,राम वरघुडे,गणेश कांगुणे,रोहित शिंदे आदींसह बेलपिंपळगाव व परिसरातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी बोलतांना आ.शंकरराव गडाख पुढे म्हणाले की,बेलपिंपळगाव येथे साकारला जाणारा अश्वारूढ पुतळा प्रत्येकाच्या जीवनात नवचैतन्य निर्माण करणारा क्षण आहे.छत्रपती शिवराय व सर्व महापुरुष यांना स्मरून सर्वसामान्य जनतेचे कामे करण्याचा प्रयत्न करत असल्याचे आ गडाख यांनी सांगितले
पुढील काळात तालुक्यात तरुणांना रोजगार देण्यासाठी विशेष प्राधान्य देणार असल्याचे सांगितले.बेलपिंपळगाव गाव व गटात अनेक कामे मार्गी लावली असून अनेक कामे निश्चितपणे सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने मार्गी लावणार असल्याचे सांगितले. शिवरायांचा पुतळा आपल्या सर्वांना प्रेरणा देणारा ठरणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार स्फूर्तीदायी आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळा उभारणीचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे आशा सूचना आ. गडाख यांनी शिल्पकार दिल्या. पुतळा उभारणी व सुशोभीकरण कामाच्या थ्री डीची पाहणी केली.
याप्रसंगी शिवव्यख्याते इंजि रमेश सरोदे यांनी उपस्थित शिव प्रेमींना छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास समजावून सांगितला.आ.शंकरराव गडाख यांनी पुतळा उभारणीच्या कामात सहकार्य केले याबद्दल त्यांचे विशेष आभार मानले व आ गडाख यांच्या उपस्थितीत दरवर्षी दसरा मेळावा बेलपिंपळगाव येथे घेण्याचा मनोदय व्यक्त केला.
राजेंद्र शिंदे,कार्ल्स साठे,नवनाथ पठाडे, बाळासाहेब शिंदे,काकासाहेब शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक
चंद्रशेखर गटकळ यांनी केले.
सरपंच सकाहरी शिंदे यांनी आभार मानले.
अनेक वर्षांपासून बेलपिंपळगाव येथील अश्वारूढ पुतळ्याचे काम मार्गी लागावे ही
शिवप्रेमींची इच्छा होती.आ. शंकरराव गडाख यांच्या पुढाकाराने बेलपिंपळगाव येथे पुतळा दीड महिन्यात पूर्णत्वास येत आहे. याबद्दल शिवप्रेमींनी आ. गडाख यांचे विशेष आभार मानले.