माय महाराष्ट्र न्यूज:महायुतीतील प्रमुख नेते मंगळवारी पत्रकार परिषद घेणार आहे. आज दुपारी अडीच वाजता ही परिषद पार पडणार असून महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युलाही यात जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.
यात दरम्यान भाजपच्या गोटातून उमेदवारी संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आलीय. या बातमीमुळे आमदारांच्या हृदयाची धकधक वाढवण्याची शक्यता आहे.भाजपच्या पहिल्या यादीमध्ये वर्तमान आमदारांना पुन्हा एकदा तिकीट देण्यात
येणार असल्याची माहिती आहे. पण त्याचबरोबर भाजप पक्षश्रेष्ठी काही आमदारांचे तिकीट कापणार असल्यची माहिती मिळत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या आमदारांचे काम चांगले नाही त्यांना डच्चू मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह महायुतीच्या अन्य महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत ही पत्रकार परिषद होणार आहे. यावेळी महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युलाही जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.
याच दरम्यान भाजपच्या आमदारांची चिंता वाढवणारी बातमी हाती आली आहे.जे आमदार पुन्हा एकदा उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांची धकधक या बातमीमुळे वाढणार आहे. कारण भाजपचे हायकमांड काही आमदारांचं तिकीट कापणार
असल्याचं बोललं जात आहे. जे आमदार पराभूत झालेत त्यांचं तिकीट कापलं जाणार आहे.भाजपच्या पहिल्या यादीमध्ये वर्तमान आमदारांना पुन्हा एकदा तिकीट देण्यात येणार आहे तर काही आमदारांचा पत्ता कट केला जाणार आहे. खासदारकी
लढलेल्या आणि पराभूत झालेल्या नेत्यांना उमेदवारी दिली जाणार नाहीये. पहिल्या यादीमध्ये मंत्री आणि ज्येष्ठ आमदारांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. तसेच काही वर्तमान आमदारांची तिकीट कापण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होण्यास काही तास बाकी असताना महायुतीकडून पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत कोणते मोठे निर्णय घेतले जातील. कोणती घोषणा होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले आहे.
लोकसभा निवडणुकीवेळी महायुतीत जागावाटपाचं गुऱ्हाळ शेवटच्या क्षणापर्यंत सुरू होतं. त्यामुळे अनेक मतदारसंघांमध्ये महायुतीच्या उमेदवाराची घोषणा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात झाली त्याचा फटका महायुतीला झाला.