Tuesday, June 17, 2025

ब्रेकिंग: हे महंत आजच आमदारकीची शपथ घेणार? आचारसंहितेपूर्वी भाजपची राज्यपाल नियुक्त आमदारांची इतके नावं ठरली 

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
481894906_9460333617322859_6156576721810500656_n
WhatsApp Image 2025-04-09 at 6.52.29 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातल्या विधानसभेसाठी मंगळवारी आचारसंहिता लागणार असल्याची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे राज्यपाल नियुक्त आमदारांच्या शपथविधीची तयारीही सुरू असल्याची माहिती आहे.

भाजपकडून चित्रा वाघ, विक्रांत पाटील आणि पोहरादेवीचे महंत बाबूसिंग महाराज यांची नावं राज्यपालांकडे पाठवण्यात आल्याची माहिती आहे. हे नेते मंगळवारी सकाळीच आमदारकीची शपथही घेणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्यासोबत

शिंदे गटातील दोन आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील दोन नेतेही आमदारकीची शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.राज्यपाल नियुक्त 12 आमदारांपैकी केवळ 7 जणांची नावं राज्यपालांकडे देण्यात आल्याची माहिती आहे. त्यामध्ये भाजपला 3, राष्ट्रवादीला

2 आणि शिवसेनेला 2 जागा दिल्याची सूत्रांची माहिती आहे. भाजपकडून महामंत्री विक्रांत पाटील, चित्रा वाघ आणि पोहरादेवीचे महंत बाबूसिंग महाराज यांना संधी देण्यात येणार आल्याची माहिती आहे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांच्यासह आणखी एका नेत्याला संधी देण्यात येणार आहे. एबीपी माझाला सूत्रांनी ही माहिती दिलीय. उद्याच या संभाव्य आमदारांचा शपथविधी होण्याचीही शक्यता आहे.

बंजारा समाजाचे महंत आणि पोहरादेवीचे पीठाधीश बाबूसिंग महाराज यांचं नाव या यादीत आहे. बाबूसिंग महाराज यांनी या बातमीची पुष्टी केली असून भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनद्वारे

मुंबईला येण्याचा निरोप दिल्याची माहिती त्यांनी दिली. मंगळवारी 12 वाजेपर्यंत आपण मुंबईला पोहचणार असल्याचं महंत बाबूसिंग महाराज यांनी एबीपी माझाला सांगितलं.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!