Saturday, December 21, 2024

लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होणार, खात्यात येणार 5500 रुपयांचा बोनस; पण…

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांसाठी व तरुणींसाठी लाडकी बहीण योजना राबवली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती.

जेणेकरुन जास्तीत जास्त महिला अर्ज करु शकतील आणि दर महिना महिलांना 1500 रुपयांचे अर्थसहाय्य मिळेल. मात्र, आता दिवाळीपूर्वीच सरकारने राज्यातील महिला व तरुणींसाठी एक मोठी घोषणा केली आहे.

महाराष्ट्र सरकारने दिवाळीच्या निमित्ताने लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना बोनस देण्याचे जाहीर केले आहे. म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात ते बोनसचे पैसे येणार आहेक. सरकारने लाभार्थी

महिलांना दिवाळीच्या दिवसांत 3000 रुपयांचा बोनस जारी केला आहे. तसंच, काही निवडक महिलांना व तरुणींना 2500 रुपयांची अतिरिक्त रक्कमही मिळणार आहे.इकॉनॉमिक्स टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, दिवाळी सणाच्या

निमित्ताने लाडकी बहीण योजनेंतर्गंत सर्व लाभार्थ्यांना 3000 रुपयांचा बोनस जारी करण्यात येणार आहे. या बोनसची रक्कम ही नियमित मिळणाऱ्या 1500 रुपयांव्यतिरिक्त अतिरिक्त असणार आहे. या व्यतिरिक्त 2500 रुपयांना अतिरिक्त रक्कमदेखील

खात्यात जमा होणार आहे. ऑक्टोबर महिन्यात महिलांच्या खात्यात 5500 रुपयांची रक्कम जमा होणार आहे.

दिवाळीचा बोनस फक्त लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलानांच मिळणार आहे.

1 महिलेचे नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीत हवं

2 योजनेचा लाभ कमीत कमी तीन महिन्यांपर्यंत घेतला असेल

3 महिलांचे अधार कार्ड आणि बँक खाते लिंक असलेले पाहिजे

या अटींची पूर्तता पूर्ण केलेल्या महिलांना 3000 रुपयांचा बोनस मिळणार आहे. ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.

कोणत्या महिलांना अतिरिक्त 2500 रुपये मिळणार?

3000 रुपयांच्या बोनसशिवाय काही निवडक महिलांना 2500 रुपयांची अतिरिक्त रक्कम दिली जाणार आहे. हा अतिरिक्त लाभ या महिला वर्गासाठी उपलब्ध आहे.

दिव्यांग महिला

एकल माता

बेरोजगार महिला

दारिद्ररेषेखालील महिला

आदिवासी भागातील महिला

या महिलांना एकूण 5500 रुपये (3000+2500) चा लाभ मिळणार आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!