माय महाराष्ट्र न्यूज:विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांची यादी शुक्रवारी (ता. १८) किंवा शनिवारी (ता. १९) जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.
पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून पहिल्या यादीतील उमेदवारांच्या नावाची घोषणा होऊ शकते.मंगळवारी पुण्यासह राज्यभरातील पक्षाच्या नेत्यांसह विविध पक्षातील इच्छुकांनी पवार यांच्या मोदीबागेत भेटीसाठी घेतल्या. शरद पवार हे मंगळवारी
दिवसभर मोदीबागेतील कार्यालयात इच्छुकांना भेटीसाठी उपलब्ध होते.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विलास लांडे हे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांचे भाऊ डॉ. अमोल बेनके यांना घेऊन पवारांच्या भेटीसाठी आले होते.माढ्याचे खासदार
धैर्यशील मोहिते पाटील, हिंगोलीतील पक्षाचे नेते जयप्रकाश दांडेकर, बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी पवारांची भेट घेतली.अजित पवार यांचे भाऊ श्रीनिवास पवार यांनीही पवार यांची भेट घेतली. याबरोबरच भाजपचे नेते व राज्य साखर संघाचे
माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनीही मोदीबागेत उपस्थित राहून पवार यांच्याशी चर्चा केली.शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर म्हणाले, “उद्धव ठाकरे यांच्यासमवेतही जागेबाबत चर्चा केली आहे. आता पवार यांच्याशी देखील हीच चर्चा केली.
दरम्यान एकाच टप्प्यात निवडणूक, आता एकाच टप्प्यात कार्यक्रम,” अशी सूचक प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक घेण्याचे
जाहीर केले आहे. यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. “राज्यातील निवडणूक ही एकाच टप्प्यात होणार असून मतदारही महायुतीचा एकाच टप्प्यात पराभव करण्यासाठी तयार झाले आहेत. आम्हाला प्रचारासाठी वेळ कमी मिळणार आहे, तरीही आम्ही सर्व ठिकाणी पोहोचू,
महाविकास आघाडीमध्ये २१० ते २१८ जागांवर एकमत झाले आहे. पुढच्या दोन दिवसांत उर्वरित ६० जागांवरही एकमत होईल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.