नेवासा/प्रतिनिधी
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कामगार विभाग उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी संभाजी माळवदे यांची नियुक्ति करण्यात आली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी तसे नियुक्ती पत्र संभाजी माळवदे यांना दिले.
काँग्रेस पक्षात पंधरा वर्षांपासून सक्रिय काम करणारे माळवदे यांनी विद्यार्थी काँग्रेस, युवक काँग्रेस, काँग्रेस अध्यक्ष अशा पदावर काम केले आहे. पंधरा वर्षांत काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी अतोनात प्रयत्न केले आहे. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तळागाळातील जनसामान्यांच्या प्रश्नासाठी ते सोडविण्यासाठी लढा दिला आहे. पक्षाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचे मोठे जाळे तयार केलें आहे. प्रश्न कोणाचाही असो मैदानात उतरून प्रसंगी आंदोलने करुन ते प्रश्न मार्गी लावले आहेत. याशिवाय प्रशासनातील भ्रष्टाचारा विरोधात माळवदे यांनी नेहमीच आवाज उचलला आहे. कोणताही राजकीय वारसा नसताना काँग्रेस पक्षात व राजकारणात माळवदे यांनी आपला ठसा उमटविला आहे.
माळवदे यांच्या रुपाने काँग्रेसच्या कामगार विभागास लढावू कार्यकर्ता लाभला आहे असे मत पटोले यांनी व्यक्त केले.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे, प्रदेशच्या विभाग संयोजक प्रज्ञाताई वाघमारे यांनी संभाजी माळवदे यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
संभाजी माळवदे यांनी माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यावर काँग्रेस अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी जो विश्वास दाखविला, जी जबाबदारी दिली ती मी सार्थपणे पार पाडील. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राज्यातील कामगाराच्या समस्या,प्रश्न जाणुन घेवून त्या निश्र्चितपणे सोडविण्यासाठी प्रयत्न करणार तर कामगारांसाठी त्यांच्या हक्कासाठी राज्यात मोठा लढा उभारणार या विभागास न्याय देण्याचा प्रयत्न करणार असे स्पष्ट केले. यावेळी प्रदेश काँग्रेस कमिटी,अहमदनगर काँग्रेस कमिटी, नेवासा तालुका काँग्रेस कमिटी कडून माळवदे यांचे अभिनंदन करण्यात आले.