माय महाराष्ट्र न्यूज:महाराष्ट्र 2024 विधानसभा निवडणूक 2024 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीची तारीख जाहीर झाली असली तरी अजून कुठल्याही पक्षाची यादी जाहीर झाली आहे. महाविकास
आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढा सुरु असताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संभाव्य उमेदवारांची यादी निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली, मात्र अद्याप महाविकास आघाडीचे जागावाटप जाहीर झालेले नाही.
मात्र तिन्ही पक्षांमध्ये २५० जागांवर एकमत झाले आहे. जवळपास २५ जागांवर तोडगा निघाला नसून मित्रपक्षांच्या वाट्याला कोणत्या जागा द्यायच्या, यावर अद्याप निर्णय झालेला नाही. अशातच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या
संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे. एकूण १३ जणांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे.यामध्ये वरळीतून आदित्य ठाकरे, अंधेरी पूर्वेकडून ऋतुजा लटके, शिवडीतून अजय चौधरी, विक्रोळीतून सुनील राऊत यांची नावं समोर आली आहेत.
इतर जिल्ह्यांचा विचार करता, राजापूर (रत्नागिरी) विधानसभा मतदारसंघातून राजन साळवी, कुडाळ (सिंधुदुर्ग) मध्ये वैभव नाईक, गुहागर (रत्नागिरी) येथून भास्कर जाधव यांची नावं निश्चित झाल्याची माहिती आहे.दरम्यान, विधानसभा
निवडणुकीसाठी जागावाटप निश्चित करण्यासाठी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक काल मुंबईत पार पडली. या बैठकीला शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत, अनिल देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, सतेज पाटील उपस्थित होते. सकाळी ११ वाजता सुरु झालेली बैठक संध्याकाळी उशिरापर्यंत चालली.
पहिली उमेदवार यादी ठरली?
1.आदित्य ठाकरे, वरळी
2.सुनील प्रभू, दिंडोशी
3.रमेश कोरगांवकर, भांडूप
4.सुनील राऊत, विक्रोळी
5.राजन साळवी, राजापूर
6.ऋतुजा लटके, अंधेरी पूर्व
7.संजय पोतनीस, कलिना
8.कैलास पाटील, धाराशीव
9.भास्कर जाधव, गुहागर
10.शंकरराव गडाख, नेवासा
11.वैभव नाईक, कुडाळ
12.नितीन देशमुख, बाळापूर(अकोला)
13.राहुल पाटील, परभणी