माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना सुरु करण्यास महाराष्ट्र शासनाने २८ जून २०२४ रोजी मान्यता दिली.
या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिना रु. १,५०० असा आर्थिक लाभ DBT द्वारे देण्यात येतो.दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर मतदारसंघाचे आमदार लहु कानडे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या सन्मान निधी चा भीक असा उल्लेख करून महाराष्ट्रातील
लाभार्थी माता – भगिनींचा अपमान केला आहे अशी व्हिडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात श्रीरामपूर मतदारसंघात व्हायरल होत आहे.या व्हिडिओ क्लिप मध्ये कानडे म्हणाले की महिला व बालकल्याण सक्षमीकरणाच्या आपण गप्पा करतो. 50 टक्के समाज महिलांचा बनला तर त्यांची दिशाभूल न करता त्यांना भीक वाढवून त्यांचे प्रश्न सुटणार नाही असे कानडे यांनी म्हटले आहे.
या वक्तव्याचा तीव्र निषेध भारतीय जनता पक्षाचे किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष नितीन उदमले यांनी केला आहे.