माय महाराष्ट्र न्यूज:भाजपची केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली आणि या बैठकीत 110 उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. त्यामुळे काही तासांत भाजपची पहिली यादी येईल. रविवारपर्यंत शिंदेंच्या शिवसेनेची आणि अजित पवारांच्या
राष्ट्रवादीची यादी येईल. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजप 160 किंवा त्यापेक्षा अधिक जागा लढण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 55-60 आणि शिंदेंच्या शिवसेनेला 73-75 जागा मिळू शकतात. तिकीट देताना भाजपचं
मायक्रो प्लॅनिंग झालेलं आहे. भाजपनं 2-3 सर्व्हे केले आहेत. त्यासोबतच, काही जुन्या नेत्यांचं पुनर्वसन करण्याचं भाजपनं ठरवल्याची माहिती आहे. तसेच काही आमदारांचा पत्ता कट होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आता सर्वांची नजर कोणाला उमेदवारी मिळते याकडे लागले आहे. २०१९च्या तुलनेत ही निवडणूक अधिक चुरशीची ठरणार आहे. महाविकास आघाडीमधील
३ पक्ष आणि महायुतीमधील ३ पक्ष अशा सहा पक्षांतून उमेदवारी कोणाला मिळणार याची उत्सुकता सर्वांना आहे. अशात सत्ताधारी गटातील भाजपची पहिली यादी १८ ऑक्टोबरला जाहीर होण्याची शक्यता आहे.भाजपची पहिली यादी १०० जणांची
असू शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पक्षाकडून या संभाव्य उमेदवारांना कागदपत्रे जमा करण्याचे आदेश दिले आहेत. महायुती कोणी किती जागा लढवायच्या याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिघात
सर्वाधिक जागा भाजप लढवणार हे निश्चित आहे. भाजप १२६ जागांवर लढण्याची शक्यता असून यातील पहिल्या १०० उमेदवारांची यादी उद्या जाहीर केली जाऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेना शिंदे गटाला ९० तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला ७२ जागा मिळण्याची शक्यता आहे.
भाजपच्या पहिल्या यादीत राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, रविंद्र चव्हाण, मंगलप्रभात लोढा, नितेश राणे, संजय कुटे, संभाजी पाटील निलंगेकर,
आशिष शेलारसह इतर नेत्यांचा समावेश असेल. पहिल्या यादीतील नावे ही अशा मतदारसंघातील असतील ज्यांची निवडणून येण्याची खात्री १०० टक्के आहे आणि जे मतदारसंघ सुरक्षित आहेत.