माय महाराष्ट्र न्यूज:काँग्रेसनेते आणि महाविकास आघाडीतील मुख्यमंत्री पदासाठी दावेदार असल्याची चर्चा असलेला चेहरा अर्थात बाळासाहेब थोरात यांना त्यांच्याच मतदारसंघात विखे पाटलांनी धक्का दिलाय. काही दिवसापूर्वी संगमनेर तालुक्यातील पेमगीरी गावातून
काँग्रेसची संवाद यात्रा सुरू झाली होती. याच गावातील अनेक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आज काँग्रेसला रामराम करत भाजपात प्रवेश केलाय. आजीमाजी ग्रामपंचायत सदस्यांसह काँग्रेसचे पदाधिकारी भाजपात दाखल झाले आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्ते थोरात यांची साथ सोडत असल्याने थोरात गटाचे टेन्शन वाढणार आहे.काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात गेल्या ८ पंचवार्षिक पासून संगमनेर मतदारसंघाचा प्रतिनिधित्व करत आहे.आतापर्यंत बाळासाहेब
थोरात यांच्या विरोधात कोणीही सक्षम उमेदवार नसल्याने थोरात यांनी आपला गड कायम राखला मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील संगमनेर विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याची चर्चा असल्याने थोरात गटाची चिंता वाढली
असल्याचे बोलले जात आहे. विखे पाटलांच्या चर्चेमुळे थोरात यांना ग्राउंडवर फिरण्याची वेळ आली असल्याची देखील चर्चा असून बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांनी मतदारसंघात संवाद यात्रा सुरू केली आहे. या संवाद यात्रेचा थोरातांना किती फायदा होईल? हे येणारा काळच सांगू शकेल.
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली तर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांना मुख्यमंत्री पद मिळू शकतो अशी चर्चा असली तरी विखे पिता पुत्रांनी बाळासाहेब थोरात यांना त्यांच्याच होम ग्राउंडवर अडकवून ठेवण्यासाठी रणनीती आखली आहे.