माय महाराष्ट्र न्यूज:”विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून सर्वांचे लक्ष हे उमेदवारांवर लागले आहे. कोणत्या पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. मात्र महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही
आघाड्यांचं जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. अशातच आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवारांची संभाव्य यादी समोर आली आहे.विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. दोन्ही आघाड्यांचं जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. अशातच कोणत्या
मतदारसंघातून कोण निवडणूक लढणार? याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून महाविकास आघाडीत तेढ निर्माण झालं असल्याचं चित्र आहे. काही जागांवर अद्यापही रस्सीखेच सुरु आहे. शिवसेना ठाकरे
गट आणि काँग्रेसमध्ये विदर्भातील जागांवरून वाद सुरु आहे. याचा परिणाम शरद पवार गटाच्या उमेदवार यादीवर झाला आहे. शरद पवार गटाची उमेदवारी यादी आज येणार होती. परंतू शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रसमधील वादामुळे उमेदवारांच्या नावांची घोषणा पुढे ढकलण्यात आली आहे.
शरद पवार गटाची संभाव्य उमेदवार यादी
इस्लामपूर- जयंत पाटील
तासगाव कवठे महांकाळ- रोहित पाटील
शिराळा- मानसिंग नाईक
उत्तर कराड- बाळासाहेब पाटील
कोरेगाव- शशिकांत शिंदे
फलटण – दीपक चव्हाण
माण खटाव- प्रभाकर देशमुख
शिरुर- अशोक पवार
जुन्नर- सत्यशील शेरकर
इंदापूर- हर्षवर्धन पाटील
आंबेगाव- देवदत्त निकम
वडगाव शेरी- बापू पठारे
दौंड- रमेश आप्पा थोरात
माळशिरस- उत्तमराव जानकर
कर्जत जामखेड- रोहित पवार
काटोल- अनिल देशमुख
विक्रमगड- सुनील भुसारा
घनसावंगी – राजेश टोपे
बीड- संदीप क्षीरसागर
मुंब्रा- जितेंद्र आव्हाड
जिंतूर- विजय भांबळे
अहेरी- भाग्यश्री अत्राम
सिंदखेड राजा- राजेंद्र शिंगणे
उदगीर- सुधाकर भालेराव
घाटकोपर पूर्व- राखी जाधव
परळी- राजाभाऊ पड
लक्ष्मण पवार- गेवराई
आष्टी- भीमराव धोंडे
केज- पृथ्वीराज साठे
माजलगाव- रमेश आडसकर
राहुरी- प्राजक्त तनपुरे
देवळाली- योगेश घोलप
दिंडोरी – गोकुळ झिरवाळ
मुक्ताईनगर – रोहिणी खडसे
जामनेर- गुलाबराव देवकर
अकोला- अमित भांगरे
पारनेर- राणी लंके
खानापूर – सदाशिव पाटील
चंदगड- नंदाताई बाभूळकर
इचलकरंजी- मदन कारंडे
तर अहिल्यानगर जिल्ह्यातील काही उमेदवारांची नावे समोर आली आहे.परंतू शेवगाव पाथर्डी मतदारसंघात कोणाला उमेदवारी दिली जाते ते समोर आले नाही.